“संजय राऊत ही राज्याला लागलेली कीड”

On: October 7, 2023 3:36 PM
---Advertisement---

मुंबई | शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. यावरून शिरसाटांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

शिरसाट यांनी संजय राऊत यांना शिवीगाळ केली आहे. संजय राऊत ही राज्याला लागलेली किड, संजय राऊत हा भड#X@ माणूस आहे. जर तो आमच्या साहेबांना अशा भाषेत बोलत असेल तर त्याचा आम्हीही ऊद्धार केल्याशिवाय राहणार नाही, असं शिरसाट म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मदारी झाले आहेत. हे दोघे माकडं आहेत. फडणवीस डमरू वाजवत आहेत. डम डम डम डम… हे दोघे नाचत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. त्याला संजय शिरसाटांनी (Sanjay Shrisat) उत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस डमरू वाजवतात. तर मग तुम्ही काय करता? संजय राऊत तुम्ही धोबी का कुत्ता… न घर का ना घाट का… शिंदे फकीर , त्यांना लालच नाही. राज्यसभा उमेदवारी मागताना त्यांनी शिंदेंना मला वाचवा असं म्हणाला होता, असं सांगत शिरसाटांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now