संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ

On: April 15, 2023 12:00 PM
---Advertisement---

मुंबई | विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा डाव आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे, असा घणाघात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसेच तपास यंत्रणांच्या दबावानं राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

रविवारी नागपुरात मविआची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नागपुरात दाखल झाले आहेत.

संजय राऊत हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी बोलताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तपास यंत्रणांच्या दबावंन राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

सभा होऊ नये म्हणून भाजप नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र उद्याची सभा ऐतिहासिक होणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत, यावरून देखील राऊत यांनी शाह यांना टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now