Ram Mandir | उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; संजय राऊत संतापून म्हणाले…

On: December 28, 2023 3:32 PM
---Advertisement---

मुंबई | अयोध्येत राम मंदिराचं काम आता अंतिम टप्प्यात आलं असून 22 जानेवारीला राम मंदिराचं (Ram Mandir)  उद्घाटन होणार आहे. भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. आता निमंत्रणावरून राज्यात राजकारण सुरू झालं आहे.

Ram Mandir | संजय राऊत संतापले

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत भाजपवर चांगलेच संतापल्याचं पाहायाल मिळालं. तसेच आम्ही काय त्यांच्या आमंत्रणाची वाट पाहतोय काय? आम्ही नंतर अयोध्येला जाणारच आहोत, असं राऊतांनी भाजपला ठणकावून सांगितलं आहे.

आमंत्रणाचं राजकारण या देशात कधीही झालं नव्हतं. भारताच्या नव्या संसदेचं उद्घाटन झालं. तेव्हा देखील हाच प्रकार झाला होता. हे सर्व सोहळे एका पक्षाचे आहेत. देशाचे नाही राष्ट्रीय स्वरूप नाही. अशा प्रकारे कार्यक्रम होतात त्याला राष्ट्रीय स्वरूप आणलं पाहिजे हे राष्ट्राला समर्पित असावं. संसद असेल या अयोध्या असेल, असं राऊत म्हणाले.

देशाच्या स्वतंत्र संग्रामामध्ये कवडीमोल योगदान चार आण्याचा देखील योगदान नाही. हिंदुस्थानच्या संसदेचं उद्घाटन करणार अयोध्येमध्ये ज्याचं योगदान नाही ते सर्वात पुढे आहे, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला आहे.

राम मंदिर हा एका पार्टीचा प्रोग्राम झालाय. यांनी प्रभू रामाला पूर्णपणे किडनॅप केलं आहे. बीजेपी कोण आहे? प्रभू रामाचे निमंत्रण देणारे हे कोण? यांचा पॉलिटिकल इव्हेंट संपल्यानंतर आम्ही स्वतः जाणार आहोत, असं राऊतांनी सांगितलंय.

22 जानेवारीला होणार राम मंदिराचं उद्घाटन

मागच्या कित्येक वर्षांपासून रामभक्त ज्या दिवसाची वाट पाहात होते. तो क्षण जवळ येतो आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत मोठा सोहळा होतो आहे. या दिवशी राम मंदिराचं (Ram Mandir) उद्घाटन होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Raj Thackeray | राज ठाकरे भाजपसोबत जाणार की एकनाथ शिंदेंना साथ देणार?, सहाव्या भेटीबाबत महत्त्वाची माहिती

Ajit Pawar | महायुतीत वादाची ठिणगी; भाजप-शिंदे गटाचे अजित पवारांवर गंभीर आरोप

Salman Khan | ‘…म्हणून मी आजवर एकही किसिंग सीन दिला नाही’; अखेर सलमानने सांगितलं कारण

Aishwarya Rai च्या ‘या’ चित्रपटांनी लावलं जगाला वेड, एकदा तरी आवर्जुन पहायला हवेत असे चित्रपट!

Investment Tips | 25 व्या वर्षी ‘या’ 4 गोष्टी नक्की करा, भविष्यात कधीच भासणार नाही पैशांची कमी

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now