“पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कोणाची, कोणीही सांगेल उद्धव ठाकरेंची”

On: April 28, 2024 3:59 PM
Election Results 2026
---Advertisement---

पुणे | खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदेंच्या गटाला पक्षाला मी शिवसेना फडणवीस गट म्हणतो. तर अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट आहे. तुम्ही पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कोणाची,कोणीही सांगेल उद्धव ठाकरेंची आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं.

“पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कोणाची”

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सासवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत संजय राऊत (Sanjay Raut) बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मोदींपासून अजित पवार, एकनाथ शिंदेंवर, देवेंद्र फडणवीस,  चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ज्यांनी घरातील मंगळसूत्राचा मान ठेवला नाही, त्यांनी मंगळसूत्राबात बोलू नये. देशातील हुकूमशाही उलथवून टाकली पाहिजे. शरद पवारांचा पराभव करण्यासाठी भाजपने त्यांचं घर फोडलं. मराठी अस्मितेचं रक्षण करणारा शिवसेना पक्ष फोडला. पण त्यामुळे काय वाकडं झालं?, असा सवाल संजय राऊतांनी केलाय.

तुमच्या धमक्यांना जनता घाबरणार नाही- संजय राऊत

अजित पवार यांचं काल भाषण ऐकलं, माझं कामं कर नाहीतर बघून घेईल. अरे तुम्ही कायं बघणार 4 जून नंतर तुम्हाला जनता बघून घेईल. तुमच्या धमक्यांना जनता घाबरणार नाही. धमक्या देऊन निवडणूक लढवू नका, जनता तुमच्या धमक्याला भीक घालणार नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी अजित पवारांवर केला.

ज्या पवारांनी पक्ष वाढवायला तुमच्या हातात दिला, तुम्ही कायं केलं, असा हल्लाबोल त्यांनी अजित पवार यांच्यावर केला. आचार्य अत्रे म्हणले असते असे हरामखोर 10 हजार वर्षात झाले नाही असे म्हणाले असते. तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्ही आता तुमची तुतारी चांगली वाजवणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

बारामतीत आमचेच पारडे जड यासाठी दोन्ही गट दंड बैठका मारत आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी आमची सगळी शिवसेना भक्कमपणे उभी असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं आयुष्य!

कशाला करतो गॅरंटीची बात!, रॅपच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचा जोरदार हल्लाबोल

‘आधी अजितदादांनी हे सांगावं’; रोहित पवारांचं थेट अजित पवारांना चॅलेंज

इथे मिळतंय मोफत पेट्रोल! मतदान करा अन् ‘इतक्या’ रुपयांचं पेट्रोल मोफत मिळवा

संजय राऊतांचा अजित पवारांवर अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now