“महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, त्यावर मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री बसलेत”

On: October 6, 2023 12:29 PM
Eknath Shinde
---Advertisement---

मुंबई | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारी रुग्णालयांमधील मृत्यूसत्रावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

महाराष्ट्रात यमाचा एक रेडा फिरतोय आणि त्या यमाच्या रेड्यावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बसलेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं.

शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांच्या मृत्यूला राज्य सरकारच जबाबादर आहे. त्यांचं शेतकरी आणि सामान्य माणसाकडे राज्याकडे लक्ष नाही. ठेकेदारी, टेंडरबाजी, पालकमंत्रीपद आणि महामंडळ या सगळ्या गोष्टींमध्येच राज्य सरकार मश्गुल आहे, असं राऊत म्हणालेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये 100 पेक्षा जास्त लोक मरण पावलेत. हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मनाला अवस्थ करत नसेल तर त्यांचं मन मेलं आहे, असंही राऊत म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now