“गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय”; राऊतांचा मोदींवर पलटवार

On: April 30, 2024 2:10 PM
Sanjay Raut criticized Narendra Modi
---Advertisement---

Sanjay Raut | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल (29 एप्रिल) पुण्यात भव्य सभा झाली. याच सभेत मोदी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली. त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचा उल्लेख अतृप्त आत्मा असा केला होता. मोदींच्या या टीकेला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

“मराठी माणसाचे जे शत्रू आहेत, मराठी माणसाने ज्यांना गाडलं असे अतृप्त आत्मे भटकत आहेत. त्यात गुजरातच्या अतृप्त आत्म्याची भर पडली आहे.”, अशी सणसणीत टीका राऊत यांनी मोदींवर केली आहे. त्यांनी मोदींचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्रात ढोंग, अंधश्रद्धा, फेकाफेकी चालत नाही. महाराष्ट्र हा पवित्र आत्म्यांचा प्रदेश आहे. छत्रपती शिवरायांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सुपुत्र येथे जन्माला आले. मोदीजी पुण्यात होते त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख तरी केला का? कारण त्यांना डॉक्टर आंबेडकरांवर राग आहे. संविधान बदलायचे आहेत म्हणून हे आत्मे भटकत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

तसंच पुढे ते म्हणाले की, मोदींकडे लक्ष देऊ नका. 105 आत्मे ज्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान केलं ते मोदींना शाप देणार आहेत. मोदींनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं जितकं नुकसान केलं तेवढं कुणी केलं नसेल. जर तुमच्यासारखा एकच पंतप्रधान बसला तर या राज्याची भुताटकी होऊन जाईल, असा टोलाही राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

“मोदींना आंबेडकरांवर राग, म्हणूनच..”

तसंच पुढे त्यांनी पंतप्रधान पदाबाबतही मोठं वक्तव्य केलं. ‘अतृप्त आत्म्यांच्या विरोधात आमची लढाई आहे. उद्या महाराष्ट्रातल्या 105 हुतात्म्यांना आम्ही आदरांजली वाहू आणि त्यांना सांगू की या अतृप्त आत्म्यांचा बदला घेऊ. आमच्याकडे पंतप्रधान पदाचे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत. हे लोकशाहीचे उत्तम उदाहरण आहे. आम्ही पंतप्रधान लादणार नाही लोक जे स्वीकारतील तो प्रधानमंत्री होईल.’, असा खोचक टोला राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींना लगावला.

नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

आपल्याकडे म्हटलं जातं काही अतृप्त आत्मा असतात. त्यांची स्वप्नं पूर्ण झाली नाहीत की ते दुसऱ्यांच्या स्वप्नांमध्ये माती कालवतात. 45 वर्षांपूर्वी येथील एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. हा अतृप्त आत्मा 1995 मध्ये शिवसेना-भाजपचं सरकार अस्थिर करु पाहत होता. 2019 साली या अतृप्त आत्म्याने काय केलंय हे राज्याने पहिले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर केली होती.

News Title : Sanjay Raut criticized Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या-

“नकली शिवसेना म्हणायला ती काय मोदीजी तुमची डिग्री आहे का?”

पतंजलीला मोठा झटका, ही उत्पादनं वापरत असाल तर काळजी घ्या!

Covishield लस घेणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! रक्ताच्या गाठींसह होणार मोठे आजार

अमोल कोल्हेंच टेन्शन वाढलं! अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह

राजकारण पेटणार; पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केली अत्यंत वाईट टीका

Join WhatsApp Group

Join Now