‘घरच्या मंगळसूत्राला मान देऊ शकले नाही, ते इतरांच्या..’; राऊतांचा नरेंद्र मोदींवर घणाघात

On: April 25, 2024 3:16 PM
Sanjay Raut Criticism Of Narendra Modi
---Advertisement---

Sanjay Raut | देशात सध्या मंगळसूत्रावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आता सौभाग्याचं लेणं केंद्रस्थानी आलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी कॉँग्रेसवर निशाणा साधत मोठं वक्तव्य केलं होतं. राजस्थानमधील एका सभेत त्यांनी काँग्रेस आई-बहिणींचे मंगळसूत्र पण शिल्लक ठेवणार नाही, असं म्हटलं होतं. मोदींच्या या वक्तव्यावरून आता विरोधक भाजपाला चांगलंच घेरत आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनीही या मुद्यावरून टोलेबाजी करत थेट प्रश्न उपस्थित केला. जो व्यक्तीने घरच्या मंगळसूत्राला मान देऊ शकला नाही, त्याने इतरांच्या मंगळसूत्रांची उठाठेव करू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसंच मणिपूरला किती महिलांची मंगळसूत्र गेली?, असा सवालही यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.

यावेळी राऊत यांनी भाजपाच्या धोरणावरही टीका केली. नरेंद्र मोदी आता महिलांच्या मंगळसूत्राला हात घालू लागले आहेत. पाकिटमारी करू लागले आहेत, ही भाजपाची भूमिका आहे का? खरं म्हणजे काँग्रेसच्या राज्यात नाही तर मोदींच्या राज्यात महिलांची मंगळसूत्र गहाण पडत आहेत. लुटली जात आहेत आणि हे मंगळसूत्राच्या गोष्टी करत आहेत.अशी टीका राऊत (Sanjay Raut ) यांनी केली.

मंगळसूत्रावरुन राजकारण तापलं

राऊत यांनी राम मंदिराचा मुद्दाही उपस्थित केला. अयोध्यात जेव्हा आंदोलन सुरु होतं तेव्हा हे डरपोक कुठे होते,रामाच्या साहाय्याने हे निवडणुका जिंकायला बघत आहेत.त्यांची शेवटची फडफड सुरु आहे, अशी टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर केली.

तसंच 4 जूननंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येईल. त्यानंतर एकनाथ शिंदे गट पूर्णपणे संपलेला असेल, त्यांचा एकही खासदार निवडून येत नाही.अजित पवार आणि एकनाथ शिंदे संपलेले असतील, असा दावाही यावेळी राऊत (Sanjay Raut ) यांनी केला.

News Title :  Sanjay Raut Criticism Of Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या- 

घराबाहेर पडताना काळजी घ्या; ‘या’ 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

राहुल गांधींच्या तोंडी पुन्हा ऐश्वर्या राय बच्चनचं नाव, म्हणाले…

नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट; भुजबळांच्या माघारीनंतर भाजपकडून थेट ‘हा’ नेता मैदानात?

बँकेची कामे लवकरात लवकर उरकून घ्या; मे महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद

‘त्या’ प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत; संजय दत्तचेही नाव समोर आल्याने खळबळ

Join WhatsApp Group

Join Now