Sanjay Raut | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर काही नेत्यांना महाविकास आघाडीकडून अटक करण्याचं नियोजन होतं, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला.
राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मला अटक होईल याभीतीने देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकला. चाळीस आमदार घेऊन या नाहीतर अटक करू. असं त्यांना सांगण्यात आलं होतं. एकनाथ शिंदे यांनाही अटकेची भीती घातली. एकनाथ शिंदे यांच्यावर मोदी सरकारने दबाव आणला होता. ते 40 आमदार घेऊन या नाहीतर अटक करू, असा मोठा गौप्यस्फोट राऊत (Sanjay Raut) यांनी केला.
राऊत म्हणाले की, “प्रवीण दरेकर यांच्यावर बँक घोटाळ्याचा आरोप आहे. बेकायदेशीर कर्ज वितरणाचा आरोप आहे. त्याची चौकशी सुरू होती. लाड यांच्यावर अनेक गुन्हे आहेत. डरपोक लोकं आहेत. स्वत:ची अटक लपवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. गिरीश महाजन यांच्यावर मोठे गुन्हे आहेत. केंद्रामध्ये सरकार 100 टक्के बदलत आहेत, असं राऊत म्हणालेत.
“कोकणच्या मातीत तुमचा तीन वेळा पराभव केलाय”
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका केलीये. “त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू द्या. त्यांचं वय झालं आहे. त्यांनी आता जे टोप घातले आहेत, त्या टोपची केसं देखील पिकली आहेत. एवढे वय झाले आम्हाला दादागिरी सांगू नका. कोकणच्या मातीत तुमचा तीन वेळा पराभव केलाय,” असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केलीये.
एका माध्यमाला मुलाखत देत असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितलं की, देवेंद्र फडणवीस यांचं कटकारस्थान महाविकास आघाडीने आखलं होतं, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी नुकताच केला. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना केवळ देवेंद्र फडणवीस नाहीतर गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात खटले उभे करून त्यांना अटक करून तरूंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडीने आखला,” असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
News Title – Sanjay Raut Big Statement About Devendra Fadanvis
महत्त्वाच्या बातम्या
लोकांची लायकी नाही!, मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे ‘या’ कारणामुळे लोकांवर चिडली
अमित शहांच्या सभेआधी मोठा राडा, बच्चू कडू थेट पोलिसांना भिडले
“पार्थला भाऊ म्हणून सांगतो…”, रोहित पवारांचा उपरोधिक टोला
“मंगळसूत्र कशासाठी?…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
हार्दिक पांड्या T20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या अडचणी वाढवू शकतो!






