“श्रीकांत शिंदे अजून बच्चा”, संजय राऊतांची तोफ धडाडली

On: April 5, 2024 3:13 PM
Sanjay Raut
---Advertisement---

Sanjay Raut | आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटप करणं सुरूच आहे. अनेकांचं लक्ष हे कल्याण मतदारसंघाकडं लागलं आहे. शिवसेना ठाकरे गटाने ठाकरे गटाच्या कार्यकर्ता वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र अद्यापही कल्याण मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली नाही. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) कडाडले आहेत.

अनेक दिवसांपासून कल्याण मतदारसंघातून ठाकरे गटातून कोण लढणार यावर प्रश्नचिन्ह होतं. दिवंगत शिवसैनिक आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्याची चर्चा होती. मात्र ठाकरे गटाने काल वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र अद्यापही शिंदे गटाने श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी न जाहीर केल्यानं श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्ला केला. श्रीकांत शिंदे उद्धव ठाकरे यांच्यामुळे विद्यमान खासदार आहेत, असं म्हणत राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्ला केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी श्रीकांत शिंदे यांचा समाचार घेतला आहे. “आपण आधी आपली कल्याण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करा. तुम्ही विद्यमान खासदार आहात. ती खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळं मिळाली आहे. जिंकण्याची भाषा करता दिल्ली अभी दूर है, तुम्ही आता दिल्लीत पोहोचणार नाही. आमची सामान्य कार्यकर्ता वैशाली दरेकर तिथे गद्दारी आणि अहंकाराचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही”, असं म्हणत राऊत (Sanjay Raut) यांनी टीकेचे बाण सोडले आहेत.

“अजून हा बच्चा”

“आम्ही नारायण राणे यांचा पराभव केला आहे. इंदिरा गांधींचा पराभव राज नारायण यांनी केला आहे. महाराष्ट्रात अनेक लोकं पडले आहेत. अजून हा बच्चा आहे. हिंमत असेल तर उमेदवारी जाहीर करा. राज्यामध्ये जवळपास सर्वच उमेदवाऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तुमचीच उमेदवारी जाहीर करायची राहिली आहे.”

“मुख्यमंत्र्यांना ठाण्याचे तारणहार म्हणतात. ते अजून आपल्याच ठाणे आणि कल्याणची उमेदवारी जाहीर करू शकले नाहीत. स्वत: मुख्यमंत्री हे भाजपच्या दहशतीखाली आहेत. म्हणून ते अधूनमधून कुठेतरी अदृश्य होतात. आगे आगे देखो होता है क्या”, असं म्हणत संजय राऊत यांनी हल्ला केला.

News Title – Sanjay Raut Aggressive On Shrikant Shinde

महत्त्वाच्या बातम्या

अक्षय तृतीया कधी आहे? जाणून घ्या पूजेची तारीख, वेळ आणि शुभ योग

राहुल गांधींची एकूण संपत्ती किती?, आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

‘शाळकरी मुलांना…’; काँग्रेस नेत्याचा नितीन गडकरींवर गंभीर आरोप

आता टेलिग्रामवर देखील तयार करता येणार Business Accounts; व्यवसायकांना होणार फायदाच फायदा

ठाकरेंबरोबर वाजलं, पण आंबेडकरांचा शरद पवार गटाला पाठिंबा, घेतला मोठा निर्णय

Join WhatsApp Group

Join Now