मोठी बातमी! ‘या’ बड्या नेत्याने दिला काँग्रेसचा राजीनामा

On: April 4, 2024 7:36 PM
Amethi loksabha Election
---Advertisement---

Congress | काँग्रेस नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांच्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. त्यांना काँग्रेस नेत्यांच्या स्टारप्रचारक यादीतून हटवण्यात आलं. काँग्रेसनं त्यांच्याबद्दल आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल सहा वर्षांसाठी काँग्रेसनं निरूपम यांच्यासाठी दार बंद केलं आहे. हा निर्णय रात्रीच घेण्यात आला. त्यानंतर निरूपम यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

संजय निरूपम (Sanjay Nirupam) हे ठाकरे गटावर टीका करत होते. मुंबईतील एका मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढवायची होती. मात्र त्याऐवजी ठाकरे गटाच्या उमेदवाराला ती जागा देण्यात आल्याने निरूपम वारंवार ठाकरे गटावर टीका करत होते. म्हणून काँग्रेसनं निरूपम यांना आधी स्टारप्रचारकांच्या यादीतून हटवलं. त्यानंतर आता निरूपम यांना सहा वर्षांसाठी पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये येता येणार नसल्याचं सांगितलं.

सहा वर्षांसाठी काँग्रेसचं दार बंद

मुंबईतील वायव्य मतदारसंघातून संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांना निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र त्याजागेवर ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी नाराजी दाखवली. याबाबत संजय निरूपम यांच्या मनामध्ये राग होता. रागाच्या भऱात त्यांनी अनेकदा ठाकरे गटावर टीका केली. यामुळे काँग्रेसनं सहा वर्षांसाठी आपलं दार बंद ठेवलं आहे.

निरूपम काय म्हणाले?

स्टार प्रचारकातून निरूपम यांचं नाव हटवल्यानंतर त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे. “पक्षाने आता माझ्यावर आणि माझ्या कार्यालयीन खर्चावर अधिक ऊर्जा आणि पैसा खर्च करु नये,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. पक्षाने लवकर निर्णय घ्यावा, असा इशारा त्यांनी दिला.

संजय निरूपम शिंदे गटाच्या वाटेवर जाणार असल्याच्या चर्चा आहेत. अमोल कीर्तिकर यांना पश्चिम मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्यानंतर निरूपम यांनी वक्तव्य केलं होतं. “मी आठवडाभर बघेल नाहीतर माझा निर्णय घेईल”, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

News Title – Sanjay Nirupam Against Congress Party Take Big Desicion

महत्त्वाच्या बातम्या

धमाकेदार फीचर्ससह Skoda Superb पुन्हा मैदान गाजवण्यास सज्ज; जाणून घ्या किंमत

आज गुजरात टायटन्स पंजाब किंग्ससोबत भिडणार; कोण वर्चस्व गाजवणार

शाहरुखच्या टीमने दिल्लीवाल्यांना केलं पराभूत

कन्या आणि तूळ राशीसह या 3 राशींच्या व्यक्तींसाठी राजकीय दृष्ट्या चांगला दिवस

‘सगळे पुरस्कार ऐश्वर्यालाच….’; ‘या’ अभिनेत्याचा मोठा खुलासा

Join WhatsApp Group

Join Now