“संजय राऊतांसारख्या ढेकणाला मारण्यासाठी सैन्याची गरज नाही ते…”

On: October 2, 2023 9:30 PM
---Advertisement---

मुंबई | शिवतीर्थावर आम्हीच मेळावा घेणार, यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ठाम आहेत. आमच्यावर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आमचा मेळावा शिवतीर्थावरच होणार. तुम्ही सैन्य जरी बोलावलं तरी आमचा मेळावा शिवतीर्थावर होणार, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. राऊतांच्या या वक्तव्याला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं.

संजय राऊतांसारख्या ढेकणाला मारण्यासाठी सैन्याची गरज नाही. ते पोलिसांच्या गराड्यातून दहा मिनिटंही बाहेर आले तर आमचा एक सैनिकही त्यांना पुरून उरेल, असं संजय गायकवाड म्हणाले.

शिवतीर्थावर मेळावा घेण्यास बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवात केली. तिथे बाळासाहेबांनी कडवट हिंदुत्वाचे विचार मांडले. आमचीही तीच धारणा आहे, बाळासाहेबांच्या विचाराने आणि पदस्पर्शाने पावन झालेलं ते शिवतीर्थ आहे. त्या शिवतीर्थावरून केवळ शिवसेनेचे हिंदुत्वाचे विचार मांडले गेले पाहिजेत, असं त्यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली असून आज ते काँग्रेसबरोबर युतीच्या गोष्टी करतायत. त्यामुळे ते शिवतीर्थावरून कधीच बाळासाहेबांचे विचार मांडू शकत नाहीत, म्हणून आमच्या पक्षाचा आग्रह आहे की, ती जागा आम्हालाच भेटली पाहिजे, असं म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now