Shoaib Malik च्या तिसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया देत सानिया मिर्झाने केला मोठा गौप्यस्फोट!

On: January 21, 2024 3:46 PM
Shoaib Malik
---Advertisement---

Shoaib Malik | पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने तिसऱ्यांदा लग्न करुन सगळंयाना आश्चर्याचा धक्का दिला. भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या. शिवाय दोन दिवसांपूर्वी सानियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी सानियाचा पती शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद नव्याने संसार थाटला. दरम्यान, त्याच्या तिसऱ्या लग्नावर पत्नी सानिया मिर्झाने तिची पहिली प्रतिक्रिया देत एक नवा खुलासा केला आहे.

काय आहे नेमका प्रकार?

सानिया मिर्झा आणि शोएब (Shoaib Malik) यांच्या लग्नाला 18 वर्ष झाले आहेत. कोरोना काळानंतर या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर या दोघेजण घटस्फोट घेणार असल्याचं समोर आलं. मात्र, दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा जरी असल्या तरी मात्र, या दोघांचा घटस्फोट झाल्याचं स्वतः सानिया मिर्झा हिच्या बहिणीने सांगितलं आहे.

काय म्हणाली अनम मिर्झा?

सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अनम म्हणाली की, “सानिया मिर्झाने कायम स्वतःचं खासगी आयुष्य चाहत्यांपासून गुपित ठेवलं आहे. पण आता एक गोष्ट सांगणं फार महत्त्वाचं आहे. काही महिन्यांपूर्वीच सानिया आणि शोएब यांचा घटस्फोट झाला आहे. सानियाने शोएब (Shoaib Malik) याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत”.

पुढे अनम म्हणाली की, ‘सध्या सानिया हिच्या आयुष्यातील प्रचंड नाजूक काळ सुरु आहे. म्हणून चाहत्यांना विनंती आहे की, सानिया हिच्या गोपनीयतेचा आदर करा. शिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका….’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anam Mirza (@anammirzaaa)

शोएबच्या लग्नाची चर्चा

शोएबच्या लग्नानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक सगळीकडे ट्रेंड होत आहेत. तसेच सोशल मीडियावर देखील दोघांना ट्रोल केलं जात आहे. सानियाला अनेक भारतीयांनी उपदेशाचे डोस दिले आहेत.

शोएब मलिकच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट येत आहे. बरेच जण यावर व्यक्त होत आहे. शोएब मलिकबरोबर सानिया मिर्झाला सुद्धा ट्रोल केलं जात आहे.

News Title : sanias reaction on shoaib maliks marriage

महत्त्वाच्या बातम्या-

Plane crashed in Afghanistan | सर्वात मोठी बातमी! मॉस्कोला जाणारं विमान अफगाणिस्तानात कोसळलं

Ram Mandir | 22 जानेवारीला काय बंद काय चालू?; वाचा एका क्लिकवर

Rashmika Mandanna च्या डिपफेक प्रकरणी सर्वात मोठी माहिती समोर!

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांनी केली मोठी घोषणा, म्हणाल्या ‘लवकरच…’

मोदींना तोंड दाखवलं नाही; लैंगिक छळाचे आरोप अन् Brijbhushan Singh यांचा खुलासा

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now