Sania Mirza शोएब मलिकसोबत घटस्फोट घेणार?; उचललं मोठं पाऊल

On: January 15, 2024 7:24 PM
Sania Mirza
---Advertisement---

नवी दिल्ली | टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा माजी फलंदाज शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. पण आता सानियाने असं काही केलं आहे. ज्यामुळे दोघांचं नातं संपुष्टात आल्याचं चाहत्यांना वाटू लागलं आहे.

शोएब मलिकसोबत घटस्फोट घेणार?

सानिया मिर्झा (Sania Mirza) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पती शोएब मलिकचे सर्व फोटो हटवले आहेत. यामुळे पुन्हा एकदा दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

याआधी मलिकनेही सानियाच्या लग्नाची माहिती त्याच्या इंस्टाग्राम बायोमधून काढून टाकली होती. पण याआधी त्याने सानियाला सुपरवुमनचा नवरा म्हटलं होतं.

शोएब आणि सानिया हे कायदेशीर पद्धतीने घटस्फोट घेण्याच्या विचारात असल्याचंही म्हटलं जातं आहे. इतकंच नव्हे तर हे दोघं वेगवेगळे राहत असल्याचीही चर्चा होती

Sania Mirza ने उचललं मोठं पाऊल

माजी टेनिस स्टार सानिया आणि शोएबला एक मुलगाही आहे. सानियाने तिच्या मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर केले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. शोएबबद्दल बातम्या आल्या होत्या की तो पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

आयेशाने शोएब मलिकच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शोएबसोबतच्या तिच्या कथित अफेअरविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली मी कधीच कोणत्याही विवाहित किंवा कमिटेड पुरुषाकडे आकर्षित होणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

Deepika Padukone च्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी!

Ram Mandir | अमिताभ बच्चन यांची अयोध्येत कोटींची डील?, आकडा ऐकून थक्क व्हाल

UPI संबंधित 5 नवीन नियम, जाणून घ्या अन्यथा होईल मोठं नुकसान

Madhuri Dixit च्या लवलाईफ बद्दल सर्वात मोठा खुलासा!

TMKOC | बबीताजीबद्दल बोलतानाचा जेठालालचा व्हिडीओ तूफान व्हायरल!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now