‘जग जिंकत होते, तेव्हा लोक म्हणाले संसार…’, सानिया मिर्झाची पोस्ट चर्चेत

On: March 2, 2024 4:18 PM
Sania Mirza post
---Advertisement---

Sania Mirza | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला (Sania Mirza) घटस्फोट देत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने तिसऱ्यांदा लग्न केलं. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच सानियाने त्याला ‘खुला’ दिल्याचं म्हटलं गेलं. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नाचा संसार थाटला आहे.

घटस्फोटानंतर सानिया मिर्झा सतत सोशल मिडियावरती सक्रिय असते. आता नुकतीच तिने एक नवीन पोस्ट पोस्ट केली आहे. ज्याची आता चर्चा रंगली आहे. महिलांना यशस्वी असूनही नको त्या गोष्टींचा सामना करावा लागतो.

सानिया मिर्झा- शोएब मलिक घटस्फोट

आजही महिलांचं यश त्यांचं करिअर यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक बोललं जातं. सानियाने पोस्टच्या माध्यमातूनच यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अर्बन कंपनीची जाहिरात ‘छोटी सोच’वर प्रतिक्रिया देत सानियाने स्वतःच्या आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

अर्बन कंपनीच्या या जाहिरातीमध्ये एका ब्युटिशियन महिलेला कार खरेदी केल्यानंतर शेजारी आणि लहान भावाच्या अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. या जाहिरातीवर सानिया मिर्झाने (Sania Mirza) आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सानिया मिर्झाची पोस्ट

2005 मध्ये WTA किताब जिंकणारी मी पहिली महिला होती…. हे मोठं यश आहे… आहे ना? जेव्हा मी डबल्सच्या जगातील अव्वल खेळाडू होते, तेव्हा मी संसार कधी थाटणार… हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते.

सहा ग्रँडस्लॅम जिंकणे समाजासाठी पुरेसं नव्हतं. माझ्या प्रवासात ज्यांनी माझं समर्थन केलं. त्यांची मी आभारी आहे. पण काही गोष्टींचा विचार करण्यापासून मी स्वतःला थांबवू शकत नाही. मला आश्चर्य वाटतं की, महिलेचं कौशल्य आणि कामापेक्षा त्यांच्या लैंगीक अपेक्षा आणि देखाव्यांबाबाद चर्चा केली जाते. अशा आशयाची पोस्ट सानिया मिर्झाने (Sania Mirza) केली आहे.

पुढे सानिया  म्हणते,  ‘मला माहिती आहे समाजातील वास्तविकतेवर भाष्य करणं कठीण आहे आणि कधीकधी गैरसोयीचं देखील ठरतं. पण आपण महिलांच्या यशासोबत कसं गप्प राहू शकतो. यावर आत्मनिरीक्षण करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता सानिया मिर्झाची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

News Title-  Sania Mirza post

महत्त्वाच्या बातम्या –

गौतम गंभीरने घेतला सर्वांत मोठा निर्णय!

गुड न्यूज! वयाच्या 48 व्या वर्षी शोएब अख्तर तिसऱ्यांदा झाला बाप

‘मी 18 वर्षांची असताना…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा करण जोहरबद्दल मोठा खुलासा

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट समोर!

 

Join WhatsApp Group

Join Now