“मी पुन्हा गरोदर होण्यास तयार, मात्र…”, गर्भधारणेबद्दल सानिया मिर्झा खुलासा

On: May 12, 2025 12:45 PM
sania mirza
---Advertisement---

Sania Mirza | सानिया मिर्झा (Sania Mirza), भारताची आघाडीची महिला टेनिसपटू, तिने नुकताच आपल्या मातृत्वातील भावनिक संघर्षावर मोकळेपणाने भाष्य केलं आहे. बाळ इझहान मिर्झा मलिक (Izhaan Mirza Malik) ला स्तनपान देताना आलेले भावनिक ताण तिला गर्भधारणेच्या तुलनेत अधिक कठीण वाटले, असं तिने स्पष्टपणे सांगितलं.

गर्भधारणेपेक्षा स्तनपान अधिक कठीण-

सानियाने (Sania Mirza) एका मुलाखतीमध्ये बोलताना एक खुलासा केला . तिने सांगितलं की, “मी सुमारे अडीच ते तीन महिने स्तनपान केलं. माझ्यासाठी हा सगळ्यात कठीण टप्पा होता. मी पुन्हा तीनदा गरोदर होण्यास तयार आहे, पण पुन्हा feeding चं हे सगळं… मला खरंच माहीत नाही मी परत करू शकेन का.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

ती पुढे म्हणाली की, या प्रक्रियेमधील शारीरिक मेहनत नव्हे तर मानसिक आणि भावनिक बाजू अधिक थकवणारी होती. एक काम करणारी महिला म्हणून, बाळ पूर्णपणे त्या feeding वर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक गोष्ट त्याभोवतीच फिरत असे. “वेळेचं बंधन, पुरेशी झोप न मिळणं, आणि प्रत्येक क्रिया त्या feeding च्या वेळांनुसार ठरवावी लागत असे,” असं तिने स्पष्ट केलं.

कामकाजी मातांसाठी भावनिक आव्हान-

सानियाने (Sania Mirza) स्पष्ट केलं की, स्तनपानामुळे कामकाजावर परिणाम होतो. ती म्हणाली की, बाळाच्या गरजांशी संबंधित वेळेच्या बंधनांमुळे स्वतःच्या दिनचर्येत कोणतेही स्वातंत्र्य राहत नाही. अनेक महिलांना हा टप्पा ताणतणावाचा वाटतो आणि त्याचा मानसिक परिणामही होतो, असं ती म्हणाली.

तिने असंही म्हटलं की, “जेव्हा बाळ पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असतं, तेव्हा तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. तुम्ही कामावर जाता, झोप कमी होते, आणि मनात कायम ही चिंता असते की पुढचं feeding केव्हा करायचं.”

News Title – Sania Mirza Opens Up on Breastfeeding Struggles

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now