Sania Mirza आणि मोहम्मद शमी लग्नबंधनात अडकणार?; चर्चांना उधाण

On: January 24, 2024 1:57 PM
---Advertisement---

Sania Mirza | भारतीय माजी टेनिसपटू सानिया मिर्झा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेचा विषय बनली आहे. सानियाचा पती म्हणजेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने सानियाला घटस्फोट देत पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदबरोबर नव्याने संसार थाटला. शोएबच्या लग्नामुळे सोशम मीडियावर त्याला चांगलंच ट्रोल केलं गेलं तर सानियाला देखील भारतीयांनी उपदेशाचे डोस दिले आहेत. मात्र सध्या चर्चा आहे ती, सानिया आणि मोहम्मद शमी यांच्या लग्नाची.

सानिया पुन्हा अडकणार लग्नबंधनात?

सानिया (Sania Mirza) आणि शोएब यांच्या लग्नाला 14 वर्ष झाले असून करोना काळात या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासूना दोघांच्या घटस्फोटाबाबत देखील चर्चा सुरु होत्या. मात्र चर्चादरम्यानच शोएबने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत लग्नगाठ बांधली. दरम्यान सोशल मीडियावर एका मीमची चांगलीच चर्चा होत आहे. या मीममध्ये सानिया आणि भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी यांच्या लग्नाबाबत फोटो व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

सानिया (Sania Mirza) आणि मोहम्मद शमी लग्न करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. मात्र नेटकऱ्यांनी त्यांचा हा मीम सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सानिया आणि मोहम्मद शमी या दोघांना ट्रोल केलं जात आहे. शिवाय या दोघांच्या लग्नातील माॅर्फ फोटो तयार करत व्हायरल करण्यात आला आहे.

सानिया मिर्झा हिचं वैवाहिक जीवन काही सुरळीत नव्हतं. शोएब मलिक तिचा पार्टनर होता. मात्र ज्यावेळी घटस्फोटाच्या अफवा उडाल्या होत्या तेव्हापासूनच काही अलबेल नव्हतं असं दिसत आहे. शोएब आणि सना यांनी लग्न करत सर्वांनाच धक्का दिलाय. शोएब मलिकने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शोएब आणि सना यांच्या डेटिंगच्या बातम्या येत होत्या. शोएबनेही अलीकडेच सनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. शोएबने लिहिलं होतं- हॅपी बर्थडे बडी! यासोबतच त्याने सनासोबतचा एक फोटोही शेअर केला होता.

News Title – sania mirza and Mohammad shami to get married

महत्त्वाच्या बातम्या-

Ramlalla Jewellery | सोन्या-चांदीची खेळणी ते हीरे-मोत्यांचा शृंगार; रामलल्लाच्या दागिन्यांची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये

Shoaib Malik | “…मग सानियाशी निकाह का केला?”; शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर शाहरूख खानचा व्हिडीओ व्हायरल

“अल्लाह त्याला याच जोडीदारासोबत…”, Shoaib Malik चे तिसरे लग्न; आफ्रिदीच्या हटके शुभेच्छा

Ram Mandir | 11 कोटी रूपये! गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याकडून रामललाला रत्नांनी जडलेला मुकुट ‘भेट’

BCCI Awards 2024 | गिल सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू; शमी, अश्विन, बुमराहसह शास्त्रींचाही सन्मान

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now