Pune News l राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्या आहे. यावेळी 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. मात्र निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यच आचारसंहिता लागू होत असते. त्यामुळे सध्या राज्यात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात नाकेबंदी देखील केली आहे.
पोलिसांना तब्बल 138 कोटींचं सोनं सापडलं :
मात्र राज्यात नाकेबंदी असल्याने वाहनांची तपासणी देखील केली जाते. अशातच आता पुण्यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. पुणे शहरातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांना नाकाबंदी दरम्यानत तब्बल 138 कोटींचं सोनं सापडलं आहे. त्यामुळे आता सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज सकाळी केलेल्या कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं पोलिसांनी जप्त केलं आहे. यावेळी पोलिसांनी एमएच 02 ईआर 8112 या कंटेनरची तपासणी केली. मात्र त्या तपासणी दरम्यान या पांढऱ्या रंगाच्या कंटेनरमध्ये भलंमोठं सोनं मिळालं आहे.
Pune News l पोलीस तपास करत आहेत :
पोलिसांनी जप्त केलेल्या या कंटेनरमधील सोन्याची एकूण किंमत तब्बल 138 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय या नियमित नाकाबंदी दरम्यान सदर सोन्याचा कंटेनर थांबवून तपासणी देखील करण्यात आली आहे.
यावेळी कंटेनर तपासणी दरम्यान पोलिसांनी या सोन्याच्या वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यावेळी चालकाकडे आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीकडे रितसर कागदपत्रं देखील होती. मात्र हे एवढं सोन डिलिव्हरी ट्रान्सपोर्टचे होते अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे.
News Title : Pune Police Found 138 Crore Gold
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेकडून शिवसेना नावाला कलंक; ‘या’ नेत्याचा मोठा आरोप
अजितदादांची जबरदस्त खेळी, मविआतील ‘या’ बड्या नेत्यांविरोधात टाकला मोठा डाव
राज्यातील ‘या’ 26 ठिकाणी होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना!
मंत्री धनंजय मुंडेंच्या संपत्तीत 5 वर्षात झाली दुप्पट वाढ, आता एकूण संपत्ती किती?
राज्यात ‘या’ 13 ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार!






