Sandipan Bhumare | छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीकडून मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, महाविकास आघाडीकडून इथे चंद्रकांत खैरे यांना संधी देण्यात आलीये. सध्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भुमरे चर्चेत आले आहेत. त्यांनी दोनच दिवसांत प्रतिज्ञापत्रात बदल केल्याचं दिसून आलं.
भुमरे यांनी पहिल्यांदा दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नीचा व्यवसाय शेती आणि घरकाम असल्याचं नमूद केलं. पण, काल (24 एप्रिल) दाखल केलेल्या दुसऱ्या अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात भुमरेंनी त्यांच्या पत्नीचा व्यवसाय शेती आणि मद्यविक्री परवाने असा नमूद केला आहे. दोनच दिवसात प्रतिज्ञापत्रात बदल केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. अनेकांच्या भुवया यामुळे उंचावल्या आहेत.
भुमरे यांनी प्रतिज्ञापत्रात दारु दुकानांची माहिती का दडवली, असा सवाल करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना घेरलं. विरोधी गटाकडून त्यांना आता टार्गेट केलं जातंय. या उमेदवारी अर्जासोबत भुमरे यांनी आपली संपत्ती जाहीर केली असून मंत्रीपदावर आल्यानंतर गेल्या 4 वर्षात त्यांच्या संपत्तीत अडीच पटीने वाढ झाल्याचं त्यातून दिसून आलं.
पत्नीचं शून्यावरून थेट 14 लाखांचं उत्पन्न
2020 मध्ये मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या पत्नी पुष्पा भुमरे यांचं उत्पन्न शून्य रुपये होतं. आता 2023 मध्ये हा 14.86 लाख रुपयांवर पोहोचला आहे. भुमरेंच्या पत्नीच्या नावावर दारू विक्रीचे दोन परवाने असल्याची माहिती त्यांनी दुसऱ्यांदा दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
भुमरे यांच्या संपत्तीचा आकडा समोर
भुमरे यांची संपत्ती 5.70 कोटींच्या वर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडे 28 लाखांची फॉर्च्यूनर कार आहे. यासोबतच भुमरेंकडे 45 तोळे सोनं देखील आहे. गेल्या 4 वर्षांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांच्या संपत्तीत अडीच पटींनी वाढ झाली आहे.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील त्यांचे विरोधक ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याकडे देखील 43 तोळे सोनं आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे भुमरेंपेक्षा (Sandipan Bhumare)अधिक श्रीमंत आहेत.मात्र, खैरेंच्या संपत्तीत कोणतीही वाढ झाली नाही.
News Title : Sandipan Bhumare changed affidavit 2 Liquor licenses in wife name
महत्त्वाच्या बातम्या-
सोन्याचे भाव रॉकेटच्या तेजीत; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर
“देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर महाराष्ट्रात…”; शरद पवारांचा थेट हल्लाबोल
कोटक बँकेवर झालेल्या कारवाईनंतर ग्राहकांवर काय परिणाम होणार?






