‘संचू, उठ ना…का असं केलंस गं?’ संचिताला अखेरचा निरोप देताना आईचा काळीज चिरणारा आक्रोश

On: June 16, 2026 10:47 AM
Sanchita Ugale
---Advertisement---

Sanchita Ugale Funeral | मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) हिने गळफास घेत आयुष्य संपवलं. या धक्कादायक घटनेने संपूर्ण कलाविश्व हादरले आहे. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तिने नालासोपारा येथील राहत्या घरात गळफास लावत अखेरचा श्वास घेतला. सध्या सोशल मीडियावर संचिताच्या अंत्यसंस्काराचा एक अत्यंत हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये तिच्या आईचा आक्रोश उपस्थितांचे काळीज चिरणारा आहे.

“संचू उठ ना…”, लाडक्या लेकीचे पार्थिव पाहून आईचा हांबरडा

संचिताच्या अचानक जाण्याने उगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी तिचे पार्थिव पाहून तिच्या आईने केलेला विलाप उपस्थितांचे डोळे ओले करून गेला. “संचू ए संचू उठ ना… तू मला आई म्हण ना.. ए बबड्या.. का असं केलंस गं?”, अशा शब्दांत तिची माऊली तिला हाका मारत होती. नेहमी हसत-खेळत राहणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला अशा अवस्थेत शेवटचा निरोप देताना संपूर्ण उगले कुटुंब रडून रडून कोसळले होते.

घरी कोणी नसताना बेडरुमचा दरवाजा लावून घेतले टोकाचे पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, संचिता नालासोपारा (Nalasopara) पूर्व भागातील आचोळे येथील ‘साई संतोषी अपार्टमेंट’मध्ये आपले आई-वडील आणि १५ वर्षांच्या लहान बहिणीसह राहत होती. रविवारी संध्याकाळी घरात कोणी नसताना तिने आपल्या बेडरुमचा दरवाजा आतून लावून घेतला. बराच वेळ झाला तरी तिने दरवाजा न उघडल्यामुळे कुटुंबीयांनी संशयावरून दरवाजा तोडला. आत प्रवेश करताच संचिता बेडरुममध्ये पंख्याला साडीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसली. तिने केव्हाच जगाचा निरोप घेतला होता. तिला तातडीने जवळच्या महापालिका रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

‘कुमकुम भाग्य’ ते ‘छावा’ सिनेमा; अल्पावधीतच मिळवली होती मोठी प्रसिद्धी

संचिता उगले हिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात उत्तम ओळख निर्माण केली होती. ‘कुमकुम भाग्य’ (Kumkum Bhagya): झी टीव्हीवरील या अत्यंत लोकप्रिय मालिकेत तिने साकारलेली ‘दिया टंडन’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.

याशिवाय तिने ‘वागळे की दुनिया’ (Wagle Ki Duniya) आणि ‘दिलवाली दुल्हा ले जाएगी’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

‘छावा’ (Chhava) चित्रपट: नुकत्याच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित आणि विक्की कौशल स्टारर ‘छावा’ या बिग बजेट चित्रपटामध्ये तिने साकारलेली महत्त्वाची भूमिका विशेष गाजली होती.

सुसाईड नोट नाही; पोलीस करत आहेत अधिक तपास

आचोळे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात घटनास्थळावरून कोणतीही ‘सुसाईड नोट’ (Suicide Note) जप्त करण्यात आलेली नाही. करिअर उत्तम चालत असताना आणि हातात चांगले प्रोजेक्ट्स असताना संचिताने एवढा टोकाचा निर्णय का घेतला, याचे नेमके कारण अजूनही गूढ आहे. पोलीस सध्या तिच्या कॉल डिटेल्स आणि वैयक्तिक बाबींची चौकशी करत असून, सखोल तपासानंतरच या आत्महत्येमागील मूळ कारण स्पष्ट होईल.

News Title: Sanchita Ugale funeral mother burst into tears Video Viral on Social Media

Join WhatsApp Group

Join Now