Samsung Galaxy S25 l आजपासून (7 फेब्रुवारी 2025) भारतात Samsung Galaxy S25 ची विक्री सुरू झाली आहे. कंपनीने 22 जानेवारी रोजी अमेरिकेत झालेल्या एका कार्यक्रमात ही सिरीज लाँच केली होती. या सिरीजमध्ये गॅलेक्सी S25, गॅलेक्सी S25 प्लस (Galaxy S25 Plus) आणि गॅलेक्सी S25 अल्ट्रा (Galaxy S25 Ultra) मॉडेल्स लाँच करण्यात आले. हे तिन्ही फोन आजपासून भारतात खरेदी करता येतील.
फोनची किंमत:
गॅलेक्सी S25:
12GB + 256GB: ₹80,999
12GB + 512GB: ₹92,999
गॅलेक्सी S25 प्लस:
12GB + 256GB: ₹99,999
12GB + 512GB: ₹1,11,999
गॅलेक्सी S25 अल्ट्रा:
12GB + 256GB: ₹1,29,999
12GB + 512GB: ₹1,41,999
1TB: ₹1,65,999
सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअरमधून (Samsung Online Store) खरेदी केल्यास विशेष रंग पर्याय उपलब्ध होतील. सॅमसंगने फ्लॅगशिप सिरीज (Flagship Series) डिव्हाइस खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
एक्सचेंज बोनस (Exchange Bonus): Galaxy S25 सिरीजसाठी जुना फोन ट्रेड इन (Trade In) केल्यास ₹9,000 चा एक्सचेंज बोनस मिळेल.
Samsung Galaxy S25 l HDFC क्रेडिट कार्ड ऑफर:
-HDFC क्रेडिट कार्ड वापरून व्यवहार केल्यास ₹9,000 चे अतिरिक्त एक्सचेंज मूल्य मिळेल.
-HDFC क्रेडिट कार्ड पूर्ण स्वाइप (Full Swipe) केल्यावर ₹8,000 चे त्वरित सवलत (Instant Discount).
-इतर उत्पादनांवर सूट: या फोन्ससोबत Galaxy 7, Galaxy Ultra किंवा Galaxy Buds 3 खरेदी केल्यास ₹18,000 ची सूट मिळेल.






