Samsung Galaxy M15 5G | तुम्हाला जबरदस्त फीचर्स आणि लेटेस्ट स्मार्टफोन कमी पैशांत खरेदी करायचा असेल तर, तुमच्यासाठी काही खास ऑफर्स आहेत, जिथे तुम्ही 12 हजारांच्या आत नवीन फोन खरेदी करू शकता. कंपनीने नुकताच Samsung Galaxy M15 5G हा नवीन फोन बाजारात आणला आहे.
हा फोन सुरुवातीला 13,299 किंमतीवर ठेवला होता. मात्र, आता तुम्ही तो 12 किंवा 10 हजारांच्या आत खरेदी करू शकता.अॅमेझॉनवर फोनसाठी विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे. अॅमेझॉनवर फक्त 12,999 रुपयांत फोन लिस्ट करण्यात आला आहे.
जर तुमच्याकडे HDFC Bank Credit Card असेल तर फोनची किंमत 1000 रुपयांनी कमी केली जाऊ शकते. कंपनी बँक ऑफरसोबत या फोनला फक्त 11,999 रुपयामध्ये खरेदी करण्याची संधी देत आहे. त्यामुळे या संधीचा तुम्हीही फायदा घेऊ शकता. 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या Samsung M15 5G फोनला कंपनीने 14,799 रुपयांमध्ये लाँच केलं होतं.
Samsung M15 5G चे स्पेसिफिकेशन
सॅमसंगच्या या फोनला कंपनीने MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर सोबत प्रस्तुत केलं आहे. फोन 6.5 इंच सुपर एमोलेड डिस्प्ले, फुल एचडी प्लस रिजोल्यूशन 1080 x 2340 पिक्सल आणि 90Hz रिफ्रेश रेटसोबत येईल. फोनमध्ये 4GB/6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल.
25W वायर्ड चार्जिंगच्या सपोर्टसाठी याला 6,000mAh बॅटरी पॅक देण्यात आलंय. याचा कॅमेरादेखील जबरदस्त आहे. 50MP मेन वाइड अॅंगल कॅमेरा आणि 2MP मायक्रो कॅमेरा सोबत 13MP फ्रंट कॅमेरा देखील आहे.
सॅमसंगचा हा फोन लेटेस्ट Android 14 Operating System सोबत मिळेल. स्मार्टफोन तुम्ही Blue Topaz, Celestial Blue आणि Stone Grey या रंगांमध्ये खरेदी करू शकता.अॅमेझॉनवर फोनसाठी सध्या विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे. तुम्ही या ऑफरचा त्वरित लाभ घेऊ शकता.
News Title : Samsung Galaxy M15 5G offer
महत्त्वाच्या बातम्या –
तुम्ही खात असलेलं तूप शुद्ध आहे की अशुद्ध?, ‘या’ टिप्समुळे फसवणूक टळू शकते
राहुल गांधीचं भवितव्य आज ठरणार; देशातील 88 मतदारसंघात मतसंग्राम
‘या’ भागावर अवकाळी पावसाचं संकट कायम; यलो अलर्ट जारी
‘या’ राशीच्या लोकांना व्यवसायात दुप्पट फायदा होईल!
अंबादास दानवेंचा मास्टरस्ट्रोक, थेट एकनाथ शिंदे यांचा ‘तो’ व्हिडीओ केला पोस्ट






