संभाजीराजेंनी मनोज जरांगेंसमोर जोडले हात; म्हणाले…

On: October 25, 2023 4:26 PM
---Advertisement---

मुंबई | एक महिन्याच्या आत मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवतो असं आश्वासन देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घ्यायला लावलं होतं. त्यावर जरांगे पाटलांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत देत उपोषण मागे घेतलं होतं.

40 दिवस उलटून गेले तरी राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलेलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहेत.

जरांगे पाटील हे उपोषणाला बसल्याची माहिती मिळताच माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी थेट अंतरवली सराटी गाठली. संभाजी राजे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी संभाजीराजेंनी मनोज जरांगेंसमोर हात जोडले.

मनोजने जलत्याग केला आहे. यावर मला काहीच बोलता येत नाहीये. त्याला काही बोलण्याची मलाच अडचण वाटतेय. परंतु, त्याने किमान पाणी तरी प्यावं ही माझी विनंती आहे. छत्रपतींच्या नात्याने मला थोडासा अधिकार आहे. मनोजने हे उपोषण करावं. परंतु, किमान पाणी तरी प्यावं, असं मला वाटतं. त्यामुळे मी त्याच्याकडे पाणी पिण्याची विनंती करतो, असं संभाजीराजे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now