“मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत संपवतो”

On: November 13, 2023 5:30 PM
---Advertisement---

मुंबई | सारथीच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाच्या आंदोलन स्थळी उपस्थित राहत, संभाजीराजेंनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.

संभाजीराजे यांनी भेट देऊन दिवाळीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी आमचे प्रश्न सुटले, तर आम्ही आंदोलन मागे घेऊ असं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. त्यावर संभाजीराजे गंमतीत म्हणाले की, मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत सोडवतो.

संभाजीरांजेंनी हे वक्तव्य पहिल्यांदाच केलेलं नाही. यापूर्वीही बीडमध्ये मराठा आरक्षण जनसंवाद यात्रेत बोलताना संभाजीराजेंनी असं वक्तव्य केलं होतं.

संभाजीराजेंचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल 

समाजाचे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपतींनी पुन्हा एकदा केलं आहे. या कामाचा पाठपुरावा करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुणेकरांनो काळजी घ्या! चिंताजनक बातमी समोर 

“एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत, नाही तर त्यांची औकात काय?”

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गौतमी पाटीलचा जलवा, ठाणेकरांना म्हणाली… 

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

शरद पवार मराठा की ओबीसी?; पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now