सलमान खानची प्रकृती खालावली? ‘तो’ व्हिडीओ पाहून फॅन्सना बसला धक्का

On: July 19, 2026 7:49 PM
Salman Khan
---Advertisement---

Salman Khan | बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्याच्या बदललेल्या लूकची चर्चा रंगली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्याला गंभीर आजार झाल्याचा अंदाज व्यक्त केला असला, तरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बदललेल्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चा :

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान पूर्वीपेक्षा वेगळ्या आणि थकलेल्या अवस्थेत दिसत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. त्याचा चेहरा बदललेला दिसत असल्याबरोबरच त्याचे वजनही कमी झाल्याचे काही चाहत्यांचे निरीक्षण आहे. त्यामुळे अनेकांना पहिल्या नजरेत तो सलमान खान असल्याचेही ओळखता आले नाही, अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर सुरुवातीला व्हिडिओतील व्यक्ती सलमान खान आहे, हे ओळखता आले नसल्याचे नमूद केले. मात्र, त्यांच्यासोबत असलेले बॉडीगार्ड शेरा (Shera) दिसल्यानंतरच ती व्यक्ती सलमान खान असल्याचे लक्षात आल्याचा दावा त्यांनी केला. या पोस्टनंतर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

Salman Khan | प्रकृतीबाबत तर्कवितर्क, अधिकृत माहिती नाही :

व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी सलमान खान यांचा बदललेला लूक पाहून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची आठवण झाल्याचे म्हटले. तर काहींनी त्याच्या वजनात झालेला बदल आणि चेहऱ्यावरील बदल पाहून चिंता व्यक्त केली. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी मद्यपान, स्टेरॉइड्स किंवा इतर कारणांबाबत तर्क मांडले, तर काहींनी त्याला गंभीर आजार झाल्याचा दावा केला.

काही चाहत्यांनी तर सलमान खान यांना एव्हीएम (AVM) नावाचा आजार झाल्याचा अंदाज व्यक्त करत त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसत असल्याचे म्हटले आहे. मात्र, या सर्व दाव्यांना कोणताही अधिकृत आधार नाही आणि अभिनेता किंवा त्यांच्या टीमकडून यासंदर्भात कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा या केवळ तर्कवितर्कांपुरत्याच मर्यादित असून, सलमान खान यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

News Title: Salman Khan Viral Video Sparks Concern

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now