घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर सलमान खानने घेतला सर्वात मोठा निर्णय!

On: April 23, 2024 3:30 PM
salman khan
---Advertisement---

Salman Khan | बाॅलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेर म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर 14 एप्रिल रोजी पहाटे गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ताबडतोब या मागे कोणाचा हात आहे याचा शोध पोलिसांनी लावला. एवढंच नाही तर मुंबई पोलिसांनी दोन दिवसातच आरोपींना आपल्या ताब्यात घेतलं. यावेळी आरोपींनी स्वतः काही खुलासे देखील केले.

सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार होण्याच्या अगदी काही तास आधी नेमबाजांना बंदूक पुरवण्यात आली होती. जरी पोलीसांचा बंदोबस्त असला तरी देखील या प्रकरणाबाबत सलमानच्या घराबाहेर चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे सलमानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सलमानने कोणता निर्णय घेतला?

घडलेल्या प्रकरणानंतर सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर बंदोबस्त करण्यात आला असला तरी देखील या प्रकाराबाबत पोलीस अजून माहिती घेत आहेत. दरम्यान सलमान खानने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सलमान खान हा पनवेलच्या फार्म हाऊसवर शिफ्ट होणार आहे. मुंबईतलं घर सोडून सलमान आता पनवेलला शिफ्ट होणार असल्याचं समोर आलं आहे.

सलमान खान हा जास्तीत जास्त वेळ पनवेलच्या फार्म हाऊसवर घालवतो आणि त्याला तिथे राहण्यासाठी अधिक आवडतं. शिवाय गॅलेक्सी अपार्टमेंटपेक्षा अधिक सुरक्षा पनवेलच्या फार्म हाऊसवर असल्याचं सांगितलं जात आहे.

सलमानला घाबरवण्यासाठी गोळीबार-

सलमान खानला घाबरवण्यासाठी बिश्नोई गँगकडून आरोपींना त्याच्या घरावर गोळीबार करायला लावल्याची माहिती आहे. आरोपींना घरावर कमीत कमी दोन मॅगेझिन फायर करण्याचे टार्गेट दिले होते. 2 मॅगेझिन म्हणजेच 12 गोळ्या फायर करा, असा आदेश हल्लेखोरांना देण्यात आला होता.

सलमानला धमकी-

आठवडा पूर्ण होण्याआधीच पुन्हा एकदा सलमान खानला (Salman Khan) धमकी आली आहे. ही धमकी लॉरेन्स बिश्नोईनं दिली असल्याचं समजतंय. दरम्यान झालेल्या गोळीबारात लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचा हात होता, अशी माहिती आता समोर आलीये.

News Title : Salman Khan takes a decision

महत्त्वाच्या बातम्या-

सोलापुरात भाजपला आणखी एक धक्का, फडणवीसांच्या विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडली!

वंचित बहुजन आघाडीने वाढवलं भाजपचं टेन्शन, ‘या’ मतदारसंघात पराभव होणार?

राजस्थानकडून पराभव झाल्यावर हार्दिकनं सांगितली ‘ही’ कारणं, चेहऱ्यावर हसू मात्र कायम!

“आम्ही बापाच्या 2 नंबरच्या पैशावर…”; भाजप महिला पदाधिकारी आणि शिंदे गटाच्या नेत्यामध्ये वादाचा भडका

‘शरद पवारांच्या मनात भाजप, त्यांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा..’, रवी राणांच्या दाव्याने खळबळ

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now