“जर हिरोईनला काही अडचण…”, ट्रेलर लाँचच्या सोहळ्यात सलमान खान रश्मिकाबद्दल काय बोलूून गेला?

On: March 24, 2025 11:46 AM
salman and rashmika
---Advertisement---

Salman Khan | बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याच्या ‘सिकंदर’ (Sikandar) या बहुप्रतिक्षित सिनेमाचा ट्रेलर अखेर काल प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचा ट्रेलर किती उशिरा येणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. काल मुंबईत झालेल्या ट्रेलर लाँच सोहळ्यात प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत ट्रेलरचे भव्यप्रमाणात अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी सलमान खानचा नेहमीसारखा मिश्किल अंदाज दिसून आला. ट्रेलर लाँच दरम्यान सलमान आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांच्यातील गोड नातं सर्वांच्या नजरेत भरलं. त्यांचं एकत्रित हसणं-खिदळणं, गप्पा आणि स्टेजवरचा संवाद चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला.

वयाच्या अंतरावरून ट्रोल-

गेल्या काही दिवसांपासून सलमान (Salman Khan) आणि रश्मिकाच्या वयात असलेल्या फरकामुळे सलमानला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होते. 58 वर्षीय सलमानसोबत 31 वर्षांची रश्मिका रोमँटिक सीन करत असल्याने दोघांच्या जोडीवर अनेकांनी टीका केली. मात्र कालच्या कार्यक्रमात सलमानने या ट्रोलर्सना मिश्किलपणे उत्तर दिलं आणि सर्वांची बोलती बंद केली.

त्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “जर हिरोईनला काही अडचण नाही आणि तिच्या वडिलांनाही काही प्रॉब्लेम नाही, तर इतरांना काय त्रास आहे?” यावरही तो थांबला नाही. पुढे तो म्हणाला, “रश्मिकाचं पुढे लग्न होईल, तिला मुलगी होईल आणि तीही मोठी होऊन स्टार बनेल, तेव्हाही मी तिच्यासोबत काम करेन. तिच्या नवऱ्याचीही परवानगी मला मिळेल.” अशा मिश्किल विधानाने उपस्थितांमध्ये हास्याचं वातावरण निर्माण झालं, तर रश्मिकानेही डोकं हलवून त्याला अनुमती दिली.

सलमानकडून रश्मिकाच्या मेहनतीचं कौतुक-

रश्मिकाच्या कामगिरीबद्दल सलमानने (Salman Khan) भरभरून प्रशंसा केली. तो म्हणाला की, “ती रोज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ‘पुष्पा 2’ चं शूटिंग करायची आणि रात्री 9 पासून ‘सिकंदर’च्या सेटवर येऊन पहाटे 6.30 वाजेपर्यंत शूट करत होती.”

सलमानने यावेळी असंही सांगितलं की, शूटिंगदरम्यान रश्मिकाची तब्येत बरी नव्हती. तिच्या पायाला दुखापत झाली होती, तरीसुद्धा तिने एकही दिवस शूटिंग थांबवलं नाही. या तिच्या समर्पणामुळे सलमानला स्वतःच्या सुरुवातीच्या काळाची आठवण झाली.

News Title : Salman khan Shuts Trolls, Praises Rashmika’s Dedication

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now