Salman Khan | सलमानने शब्द पाळला! ‘त्या’ मुलीला दिलेलं वचन केलं पूर्ण

On: January 25, 2024 7:36 PM
Salman Khan fulfills his promise to a cancer patient
---Advertisement---

Salman Khan | भाईजान सलमान खान (Salman Khan ) नेहमीच आपल्या सोशल वर्कमुळे चर्चेत असतो. अनेक रुग्णांना त्याने आर्थिक मदत केली आहे. आता सलमानने नुकतीच एका कॅन्सर पीडित मुलाची भेट घेतल्याने तो चर्चेत आला आहे. साधारण चार वर्षांपुर्वी त्याने एका 9 वर्षीय मुलाला भेटण्याचे वचन दिले होते.

आता सलमानने आपले हे वचन पूर्ण करत सर्वांचेच मन जिंकले आहे. या नऊ वर्षाच्या मुलाचे नाव जगनबीर असे आहे. मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 2018 मध्ये सलमान खान प्रथम या मुलाला भेटला होता. त्यावेळी सलमानने या मुलाला पुन्हा भेटण्याचे वचन दिले होते.

सलमान खानने पूर्ण केले वचन

जगनबीरवर ट्यूमरसाठी कीमोथेरेपीचा उपचार सुरू होता जगनबीर (Salman Khan ) जेव्हा कॅन्सरवर विजय मिळवेल, तेव्हा त्याला भेटायला येईल असे सलमान म्हणाला होता. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये वांद्रेत असलेल्या त्याच्या घरी जगनबीरची भेट घेत त्याचा कॅन्सरचा लढा सुरु झाला त्यावेळी सलमानने त्याची भेट घेतली. जनगबीरची आई सुखबीर कौर यांनी याबाबत खुलासा केला आहे.

जगनबीर 3 वर्षांचा असताना या आजाराशी झुंज देत आहे. त्याच्या मेंदुत नाण्याच्या आकाराचा ट्यूमर असल्याचे कळल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्काच बसला. उपचारासाठी जगनबीरला मुंबईत नेण्यात आले होते. तेव्हा जगनबीरला सलमानला भेटण्याची फार इच्छा होती.

जगनबीरच्या (Salman Khan ) इच्छेसाठी त्याच्या आई वडिलांनी एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ नंतर सलमान खान पर्यंत पोहोचला. तेव्हा सलमानने जगनबीरला भेटण्याचे वचन दिले होते. सलमान भेटला तेव्हा त्या छोट्याश्या मुलाला विश्वासच बसला नाही.त्याने सलमानच्या चेहऱ्याला आणि ब्रेसलेटला हात लावला. असा खुलासा जगनबीरच्या आई वडिलांनी केला.

सलमान खानने जिंकले सर्वांचे मन

जगनबीरने आपला कॅन्सरशी लढा जिंकला आहे. आता तो एकदम ठीक असून आनंदी जीवन जगत आहे. तसेच, तो रोज शाळेत देखील जात असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. जगनबीर लहान असल्यामुळे त्याला एवढ्या मोठ्या आजाराची माहिती दिलीच नव्हती. त्याच्या आई वडिलांनी त्याला आपण सलमान खानला (Salman Khan ) भेटायला जात असल्याचे सांगून मुंबईला नेले होते. मात्र, त्यांचे हे शब्द नंतर खरे ठरले. सलमानच्या या कार्याचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

News Title : Salman Khan fulfills his promise to a cancer patient

महत्त्वाच्या बातम्या-

Manoj jarange Patil: मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटलांनी घेतला मोठा निर्णय

Preity Zinta | बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ पाच वर्षांनी करणार कमबॅक?; ‘या’ अभिनेत्यासोबत दिसणार मोठ्या पडद्यावर

Sania Mirza: “मला माहीत नाही मी तिच्यामध्ये…”; सानियासोबतच्या लग्नाबद्दल Shoaib Malikचा धक्कादायक खुलासा

Manoj Jarange Patil: मराठ्यांनो सावध व्हा… सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला तो मेसेज खोटा!

Alia Bhatt च्या साडीवर ‘रामायण’, रणबीर कपूरच्या शालची किंमत लाखोच्या घरात

Join WhatsApp Group

Join Now