पहलगाम हल्ल्याचा मास्टरमईंड सैफुल्लाह कसुरीचा खळबळजनक खुलासा, व्हिडीओ तूफान व्हायरल!

On: April 24, 2025 7:44 PM
saifullah kasuri
---Advertisement---

Saifullah Kasuri | जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले. यामागे लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) उपकमांडर सैफुल्लाह कसुरी (Saifullah Kasuri) असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कसुरीचा व्हिडिओ व्हायरल-

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सीसीएस (CCS) बैठकीत पाच कठोर निर्णय घेतले. यामध्ये सिंधू पाणी करार थांबवण्याचा निर्णय, अटारी सीमेवर बंदी अशा निर्णयांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर सैफुल्ला कसुरी (Saifullah Kasuri) याने एक व्हिडिओ जारी करून भारतावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने व्हिडिओमध्ये म्हटले की, “हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. ही भारतानेच रचलेली कटकारस्थान आहे. भारतच युद्धाला कारणीभूत आहे.”

कसुरीने (Saifullah Kasuri) स्वतःहून या हल्ल्याचा निषेध करत म्हटले की, “भारतीय माध्यम आणि सरकार खोटे आरोप करत आहेत. भारतानेच काश्मीरमध्ये १० लाख सैन्य पाठवून युद्धसदृश परिस्थिती निर्माण केली आहे. भारत पाकिस्तानला संपवू इच्छितो.” असे सांगून त्याने भारतीय भूमिकेवर रोष व्यक्त केला.

जगाला कसुरीची भावनिक विनंती-

सैफुल्ला कसुरीने पुढे बोलताना भारताच्या सिंधू पाणी करारावर केलेल्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “भारत पाकिस्तानचं पाणी थांबवण्याच्या तयारीत आहे. शांतता संपवून पाकिस्तानला कमजोर करण्याचा हा प्रयत्न आहे.”

तसेच, कसुरीने आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून म्हणाले, “भारताला डोळे बंद करून पाठिंबा देण्याऐवजी सत्याकडे पाहावं. पहलगाम हल्ला भारतानेच घडवून आणला असून पाकिस्तानचा या हल्ल्यात कोणताही सहभाग नाही.” त्याच्या या निवेदनामुळे पाकिस्तानची प्रतिमा वाचवण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो आहे. दरम्यान, भारत सरकारने घेतलेल्या निर्णयांनी पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला आहे. भारताच्या आक्रमक धोरणांमुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

News Title – Saifullah Kasuri Blames India After Pahalgam Attack

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now