हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाचा मोठा निर्णय!

On: January 21, 2025 3:17 PM
Saif Ali Khan New Home After Attack
---Advertisement---

Saif Ali Khan | बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि त्याच्या कुटुंबासाठी गेल्या आठवड्यातील प्रसंग अत्यंत धक्कादायक होता. बुधवारी मध्यरात्री सैफ आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांच्या वांद्रे (Bandra) येथील सद्गुरू शरण (Sadguru Sharan) या इमारतीतील 12 व्या मजल्यावरील घरात एक चोर घुसला होता.

चोराने पैशांची मागणी करत सैफ आणि घरातील केअरटेकरवर (Caretaker) हल्ला केला. या हल्ल्यात सैफवर सहा वार करण्यात आले. यानंतर तो चोर पळून गेला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे 4-5 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याच्या पाठीतून चाकूचा एक तुकडा बाहेर काढला. सैफची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सैफ घेणार नवीन घरात आसरा

सुमारे आठवडाभर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आता सैफला डिस्चार्ज (Discharge) मिळणार आहे. आज त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. या हल्ल्यानंतर सैफने सुरक्षेच्या कारणास्तव एक मोठा निर्णय घेतला आहे. तो सध्या सद्गुरू शरण या इमारतीतील घरी परतणार नाही.

लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ त्याच्या जुन्या घरी न जाता, तो दुसऱ्या ठिकाणी राहणार आहे. सैफची प्रकृती आता ठीक असली तरी डॉक्टरांनी त्याला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

फॉर्च्युन हाईट्समध्ये (Fortune Heights) होणार स्थलांतर

आज दुपारी सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो वांद्रे येथील फॉर्च्युन हाईट्स या इमारतीत स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफचे (Saif Ali Khan)  सामान सद्गुरू शरण येथून फॉर्च्युन हाईट्समध्ये हलवले जात आहे.

फॉर्च्युन हाईट्समध्ये सैफचे कार्यालय आणि दुसरे घर आहे. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने, सैफ सध्या काही दिवस तिथेच राहणार आहे. सैफ आणि करीनाच्या जुन्या घरातील काही वस्तूही या नवीन घरात हलवण्यात आल्या आहेत.

हल्लेखोराला अटक

सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहील्ला अमीन फकीर (Shariful Islam Shehzad Mohammad Rohilla Amin Fakir) असे आहे. तो भारतात विजय दास (Vijay Das) या नावाने राहत होता. रविवारी पहाटे त्याला ठाण्यातील (Thane) लेबर कॅम्प (Labour Camp) परिसरातून अटक करण्यात आली. (Saif Ali Khan)

सुरुवातीला तो कोलकात्याचा (Kolkata) रहिवासी असल्याचे सांगत होता, मात्र नंतर तो मूळचा बांगलादेशचा (Bangladesh) रहिवासी असून काही वर्षांपासून भारतात अवैधरित्या राहत असल्याचे उघड झाले.

Title : Saif Ali Khan New Home After Attack

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now