Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) सध्या वांद्रे (Bandra) येथील एका आलिशान सोसायटीत (Luxurious Society) आपल्या कुटुंबासोबत राहत असला तरी, त्याची इच्छा मुंबईतील जुहू (Juhu) परिसरात घर घेण्याची होती. परंतु, अभिनेत्याला जुहूमध्ये घर खरेदी करता आले नाही. एका जुन्या मुलाखतीत त्याने यामागील धक्कादायक कारण उघड केले होते. मुस्लिम (Muslim) असल्यामुळे मला जुहूमध्ये घर नाकारण्यात आले, असे तो म्हणाला होता.
या मुलाखतीत सैफ अली खान म्हणाला होता, “तुम्ही एक मुस्लिम असून जुहूमध्ये घर खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर ‘आम्ही मुस्लिमांना घर देत नाही’ असे थेट तोंडावर सांगितले जाते.” एवढेच नाही तर, अभिनेत्याने भारतात होणाऱ्या भेदभावावरही (Discrimination) भाष्य केले होते.
मानवी स्वभावावर परखड भाष्य
सैफ पुढे म्हणाला, “मानवी स्वभाव कधीच साधा नसतो आणि तो कधीच असणार नाही. एक पुरुष त्याच्या बायकोशी भांडतो, भावंडं एकमेकांशी भांडतात, हे स्वाभाविक आहे. एक देश दुसऱ्या देशाशी भांडतो, एक धर्म दुसऱ्या धर्माशी भांडतो, भांडणं सामान्य आहेत. मला वाटतं की शांती आणि समजूतदारपणा असामान्य आहे.” (Saif Ali Khan)
सध्या सैफ अली खान 16 जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आहे. हल्लेखोराने केलेल्या गंभीर वारानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्याला एक महिना विश्रांतीचा (Rest) सल्ला दिला आहे.
हल्ला होण्यापूर्वी सैफ ‘ज्वेल थीफ: द रेड सन चॅप्टर’ (Jewel Thief: The Red Sun Chapter) या सिनेमाचे शूटिंग करत होता. परंतु, आता अभिनेत्याची प्रकृती पाहता दिग्दर्शकाने सिनेमाचे शूटिंग काही काळासाठी पुढे ढकलले आहे. या सिनेमाशिवाय सैफ अली खान ‘रेस 4’ (Race 4), ‘स्पिरिट’ (Spirit), ‘देवरा: पार्ट 1’ (Devara: Part 1), ‘देवरा: पार्ट 2’ (Devara: Part 2) या सिनेमांमध्येही दिसणार आहे.
तामीळ दिग्दर्शक बालाजी मोहन (Balaji Mohan) दिग्दर्शित ‘क्लिक शंकर’ (Click Shankar) या सिनेमातही सैफ झळकणार आहे. तसेच, संजय गुप्ता (Sanjay Gupta) दिग्दर्शित ‘शूटआऊट एट बायकुला’ (Shootout at Byculla) या सिनेमातही तो दिसणार आहे. विशेष म्हणजे, सैफ पहिल्यांदाच आपली मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) हिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या सिनेमाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Title : Saif Ali Khan Allegation Denied House in Juhu Because of Being Muslim






