मेरठ हत्याकांडातील आरोपी साहिलची जेलमध्ये मोठी मागणी, म्हणाला…

On: March 27, 2025 5:07 PM
Meerut Murder Case Sahil Muskan (1)
---Advertisement---

Sahil Muskan | मेरठच्या जेलमध्ये बंदिस्त असलेल्या सौरभ हत्याकांडातील आरोपी साहिल आणि मुस्कानबाबत दररोज नव्या बातम्या समोर येत आहेत. आता जेलमध्ये साहिलने केलेली एक खास मागणी पूर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याची ही मागणी ऐकून सुरुवातीला जेल अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले, मात्र नियमानुसार ती मान्य करण्यात आली.

साहिलची ‘ही’ मागणी झाली पूर्ण

मेरठ जेलचे वरिष्ठ जेल अधीक्षक डॉ. वीरेश राज शर्मा यांनी माहिती दिली की, साहिलने जेल प्रशासनाकडे केस कापण्याची मागणी केली होती. ही मागणी नियमांनुसार योग्य मानल्याने ती मान्य करण्यात आली आणि जेलमधील कर्मचाऱ्यांनी साहिलचे केस कापले.

प्रशासनाच्या माहितीनुसार, जेलमध्ये शिस्तबद्ध जीवनशैलीचे पालन आवश्यक असल्यामुळे प्रत्येक कैद्याच्या मागण्या ठरावीक निकषांवरच मंजूर केल्या जातात. त्यामुळे ही मागणीही अधिकाऱ्यांनी योग्य ती तपासून मान्य केली.

साहिल आणि मुस्कान यांनी सरकारी वकील उपलब्ध करून देण्याचा अर्ज जेल प्रशासनाकडे केला आहे. त्यांच्या या मागण्यांची प्रक्रिया सुरू असून संबंधित कागदपत्रे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहेत.

जेल प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या दोघांची प्रकृती स्थिर असून ते नियमित जेवत आहेत. त्यांचं स्वतंत्र समुपदेशन सुरू असून, वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं आहे.

हत्या आधी आठवडाभर ‘रिहर्सल’

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुस्कान आणि साहिलने एक आठवडा सौरभच्या हत्येची रिहर्सल केल्याची कबुली पोलिसांनी घेतली आहे. २२ फेब्रुवारी रोजी मुस्कानने सौरभला घरी बोलावले. त्यावेळी साहिल आधीच घरी होता.

मुस्कानने आधी चाकूने वार केला, त्यानंतर साहिलने सौरभची हत्या केली. मृतदेह लपवण्यासाठी त्यांनी प्रथम तो जमिनीत पुरायचा विचार केला होता, मात्र नंतर मृतदेहाचे तुकडे करून ते प्लास्टिकच्या ड्रममध्ये ठेवले.

 Title: Sahil’s Haircut Request Approved in Jail

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now