“फडणवीसांनी पवार साहेबांसाठी सापळा रचला अन्…”

On: February 23, 2023 12:57 PM
Sharad Pawar
---Advertisement---

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य करताना मोठं वक्तव्य केलं. पहाटेच्या शपथविधीतून सरकार बनवण्याचा प्रयत्न झाला खरा. पण त्यातून एक फायदा झाला. तो म्हणजे राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली, असं वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे.

शरद पवारांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या शपथविधीमागे पवारच होते का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली. याआधी उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पवारांच्या संमतीनेच सरकार बनलं असल्याचं म्हटलं होतं.

पवारांच्या वक्तव्यावर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी ट्विट करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

जुने विषय काढून फडणवीसांनी पवार साहेबांसाठी सापळा रचला. त्यामध्ये पवार फसले आणि मीडियात बोलून बसले, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now