“गेली 70 वर्ष प्रस्थापित मराठे गांजा ओढत होते का?”

On: October 16, 2023 3:36 PM
---Advertisement---

सातारा | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची सभा जालना येथे पार पाडली असता. येत्या 23 ऑक्टोबरपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा, असं जरांगे पाटील (Jarange Patil) म्हणाले. दरम्यान यावेळी जरांगे पाटील यांनी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याची जोरदार मागणी केली. त्यांच्या या मागणीवरून राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

माध्यमांशी बोलत असताना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट प्रस्थापित मराठ्यांवरच हल्ला चढवला आहे. गेली 70 वर्ष प्रस्थापित मराठे सत्तेवर होते. तेव्हा का मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. तेव्हा काय हे लोक गांजा ओढत होते का? गोट्या खेळत होते का?, असा संतप्त सवाल सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.

मराठ्यांसोबत अनेक समाजाची आताच आंदोलने सुरु कशी झाली? आरक्षणाचा मुद्दा आताच कसा निघाला? यापूर्वी हा विषय का निघाला नाही? गेल्या 70 वर्ष प्रस्तापित मराठा सत्तेवर होते त्यांनी काय केलं? सत्तेवर असलेले हे प्रस्थापित मराठे काय काय गांजा ओढत होते का? गोटया खेळत होते का? त्यांनी का आरक्षण दिलं नाही?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला.

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांची कोंडी केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. फक्त देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी मराठा आरक्षणाचं हत्यार उपसलं गेलं आहे, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.

थोडक्यात बातम्या

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now