“अजित पवार 2024 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार”

On: April 17, 2023 4:31 PM
---Advertisement---

मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावर रिपाइंचे नेते सचिन खरात (Sachin Khaerat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये सतत भाजपचे (Bjp) नेते अजितदादांबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. कारण त्यांना माहीत झालंय की अजितदादा 2024 ला मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत संभ्रम तयार करतात, असं सचिन खरात म्हणालेत.

बावनकुळे म्हणाले ज्याला भाजपची विचारधारा पटली, त्याचं स्वागत परंतु बावनकुळे तुमच्या भाजपची विचारधारा ही असमानतेची विचारधारा आहे आणि अजितदादा जी विचारधारा मानतात ती विचारधारा फुले, शाहू, आंबेडकर यांची समानतेची विचारधारा आहे, असं सचिन खरात (Sachin Kharat) म्हणालेत.

बावनकुळे दिवसाढवळ्या आदरणीय अजितदादांबद्दल मुंगेरीलाल के सपने पाहू नका, असंही सचिन खरात (Sachin Kharat) यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now