SA vs IND 2nd Test | टीम इंडियाचा दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत केपटाऊनमध्ये फडकावला तिरंगा

On: January 4, 2024 5:57 PM
IND vs ENG
---Advertisement---

SA vs IND 2nd Test | भारताने दुसरा कसोटी सामना 7 गडी राखून जिंकला. भारत आणि दक्षिण आफ्रिका (SA vs IND) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत मालिका बरोबरीत सोडवली. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. मात्र या सामन्यात भारतीय खेळाडूंनी शानदार कमबॅक करत दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका अनिर्णित राखण्यात यश मिळवलं.

SA vs IND 2nd Test | टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

केपटाऊन कसोटीत खूपच कमी धावसंख्या होती आणि गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ दोन दिवस एकत्र फलंदाजी करू शकले नाहीत. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचे हिरो गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज ठरलेत. या सामन्यात जसप्रीत बुमराहने 8 आणि मोहम्मद सिराजने 7 विकेट घेतल्या.

SA vs IND 2nd Test | दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत केपटाऊनमध्ये फडकावला तिरंगा

या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण टीम इंडियाने केपटाऊन टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला 55 रन्सवर गुंडाळलं होतं.

भारतासाठी सिराजने 9 षटकात 15 धावा दिल्या आणि 6 बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी 2-2 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाही फार काही करू शकली नाही आणि पहिल्या डावात 153 धावांत सर्वबाद झाले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेने दुसऱ्या डावात 3 बाद 62 धावा केल्या होत्या.

अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार

भारतीय संघ 1993 पासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात आहे. मात्र आजपर्यंत दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मात्र, केपटाऊन कसोटी जिंकून टीम इंडियाने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. अशी कामगिरी 13 वर्षांनंतर घडली आहे. त्यानंतर अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Deepika Padukone ने दिली गुड न्यूज, म्हणाली ‘रणवीर सिंग आणि मी…’

‘तब्बल 16 महिने…’; Sonam Kapoor चा मोठा खुलासा

Sourav Ganguly चा टीम इंडियाला मोलाचा सल्ला!

Aishwarya Rai ने ‘या’ व्यक्तीची भेट घेतली?, व्हिडीओमुळे एकच खळबळ

Mukesh Ambani l Jio च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज, कंपनीने आणला जबरदस्त प्लॅन

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now