“थोडं कमी पीत जा”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ तूफान व्हायरल

On: May 1, 2024 5:56 PM
Rupali Ganguly Birthday
---Advertisement---

Rupali Ganguly Birthday | टेलिव्हिजन इंडस्ट्रिमधील रुपाली गांगुली (Rupali Ganguly Birthday) ही अभिनेत्री नेहमी चर्चेत असते. 30 एप्रिल रोजी तिनं आपला वाढदिवस साजरा केला. त्यादिवशी तिनं आपल्या वाढदिवसानिमित्त (Rupali Ganguly Birthday) जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. अनेक टेलिव्हिजन क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. तर काही युट्यूबर्स देखील त्याठिकाणी आले होते. यावेळी तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. (Rupali Ganguly Birthday)

युट्यूबर्स रणवीर अलाहाबादिया देखील रुपाली गांगुलीच्या पार्टीमध्ये उपस्थित होता. तेव्हा रुपाली आणि रणवीरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला सुनावलं असून अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं आहे. (Rupali Ganguly Birthday)

रणवीर पापाराझींसमोर उभा असतो तेव्हा मागून रुपाली अडखळत येते. रणवीरच्या तोंडाचा घाम पुसते. तेव्हा रणवीर आणि रुपाली दोघेही फोटोसाठी अनकम्फर्टेबल दिसून येतात. तिचा हा वेगळा अंदाज पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केलीये. टेलिव्हिजनमधील संस्कारी सूनेचे प्रताप पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.

‘ती नशेतच दिसतेय’ नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

व्हायरल झालेल्या रुपालीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. रुपालीच्या चालण्यात, हावभावात बदल दिसल्याने अनेकांनी ती मद्यधुंद असल्याच्या कमेंट्स केल्यात. एकाने ‘थोडं कमी पीत जा’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर ‘ती नशेतच दिसतेय’, असं दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं आहे. मद्यपान केल्यावर कोणीही शुद्धीवर नसतं असं एकाने म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आधी बर्थडे पार्टी, नंतर हातात कमळ

वाढदिवसानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 मे दिवशी रुपालीने भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीत भाजपच्या कार्यालयात जात विनोद तावडे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. भाजपने केलेल्या विकासाचं तिनं कौतुक केलं आणि मलाही सहभागी व्हावसं वाटलं. मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. जे काम करेल हे चांगल्या नितीने करेल, असं अभिनेत्री म्हणाली.

स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ ही मालिका तिची प्रचंड लोकप्रिय आहे. यामध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली मुख्य अनुपमाची भूमिका साकारतेय. टीआरपीच्याबाबतीत ही मालिका नेहमी अग्रस्थानी असते. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात मालिकेचा मोठा प्रेक्षक वर्ग तयार झाला.

News Title – Rupali Ganguly Birthday Viral Video

महत्त्वाच्या बातम्या

अखेर ठरलं, ठाण्यात एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का लढणार निवडणूक!

गॅस सिलेंडरबाबत मोठी अपडेट; किमतीत झाला मोठा बदल

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश, मिळणार मोठी जबाबदारी

‘तुमचा सेवक म्हणून…’; सुनील तटकरेंनी मतदारांना दिला शब्द

महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना दिलासा; सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

Join WhatsApp Group

Join Now