रूपाली चाकणकरांचा मीरा बोरवणकरांना इशारा, म्हणाल्या ‘पुरावे द्या, अन्यथा…’

On: October 17, 2023 10:21 AM
---Advertisement---

पुणे | माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borvankar) यांच्याकडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. यानंतर बोरवणकर यांनी केलेल्या दाव्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. तर मीरा बोरवणकरांचा बोलवता धनी कोण?, असा सवाल आता अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या रूपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) उपस्थित केलाय.

पुरावे द्या, अन्यथा न्यायलयात जाणार असा इशारा देखील रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांना दिला आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

अनेक आरोप बरेच जण करतात मात्र पुरावे कोणाकडे नसतात. त्यामुळे मीरा बोरवणकर यांनी जे काही आरोप अजित पवार यांच्यावर केले आहेत. त्याचे पुरावे त्यांनी सादर करावे. आपल्याकडे पुरावे असेल तर बोलावं. गेल्या 12 वर्षांपूर्वीची गोष्ट ते आज बोलताय, त्यामुळे यामागे त्यांचा बोलवता धनी कोण? आहे हे पाहावं लागेल, असं त्या म्हणाल्यात.

दरम्यान, 2010 मधील या प्रकरणाचा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून केला आहे. येरवडा येथील तीन एकर जमीन पालकमंत्र्यांनी एका खासगी बिल्डरला दिली. पुस्तकात त्यांनी थेट अजित पवार यांचं नाव घेतलेलं नाही. परंतु जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असं म्हटलं आहे. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now