Rohit Sharma | रोहित शर्मा मोठा निर्णय घेण्याची शक्यता, वर्षाच्या सुरुवातीला देणार धक्का!

On: January 2, 2024 8:18 PM
Rohit Sharma Retirement
---Advertisement---

Rohit Sharma | भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या कसोटी मालिकेतला (INDvsSA Test Series) दुसरा सामना ३ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. टीम इंडिया दुसऱ्या कसोटीसाठी पोहोचली असून भारतीय संघाचं (Team India) मालिका जिंकण्याचं स्वप्न कायम राहतं की वर्ल्डकप प्रमाणे हे स्वप्नही अधुरं राहतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता मालिकेतील दुसरी कसोटी आणि या वर्षातील पहिल्या कसोटीची वेळ जवळ येऊन ठेपली आहे.

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना न्यूलँड्स, केपटाऊन येथे होणार आहे. कर्णधार रोहित शर्माला मालिका बरोबरीत आणायची असेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. या सामन्यात भारतीय संघ दोन मोठे बदल करू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, भारतीय संघाच्या आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) या निर्णयाकडे सगळ्या क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

भारतीय संघात कोणते मोठे बदल होणार?

रोहित शर्मा (Rohit Sharma) नव्या वर्षाच्या सुरुवातीला मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटचा उगवता तारा मानला जाणारा प्रसिद्ध कृष्णाला (Prasiddha Krishna) पहिला धक्का बसण्याची शक्यता आहे. भारतीय संघातील पहिला बदल म्हणजे प्रसिद्ध कृष्णाला संघाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी मुकेश कुमारला संधी मिळू शकते. रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यापूर्वी मुकेश कुमारसोबत नेटमध्ये सराव करण्यात बराच वेळ घालवला आहे, त्यामुळे त्याला संधी मिळण्याची सर्वाधिक शक्यता असल्याचं मानलं जातंय.

संघात दुसरा बदल हा रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) रुपानं होऊ शकतो. पहिल्या सामन्यात काही कारणांमुळे तो खेळू शकला नव्हता, मात्र आता संघाला गरज असताना रवींद्र जडेजाच्या पुनरागमनाची बातमी आहे. जडेजा आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे, त्यामुळे तो प्लेइंग-11 मध्ये तो आला तर रविचंद्रन अश्विनला (R Ashwin) बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे. याबाबत रोहित तसेच संघ व्यवस्थापन काय निर्णय घेणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

भारतीय संघाला करावी लागेल करामत-

पहिल्या कसोटीत पराभव झाल्यामुळे आता दुसरी कसोटी जिंकण्याची कियमा भारतीय संघाला करावी लागेल नाहीतर ही कसोटी मालिका सुद्धा भारताच्या हातून गेल्यात जमा आहे. भारतीय संघात कुणाचा भरणा असू शकतो याबाबत एक अंदाज व्यक्त केला जातोय. खाली आपल्याला भारतीय संघातील संभाव्य खेळाडू पाहता येऊ शकतात.

भारताची प्लेइंग-11 अशी असू शकते-

रोहित शर्मा (Rohit Sharma), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर

News Title: Rohit Sharma to make big changes against South Africa

महत्त्वाच्या बातम्या-

…अखेर रोहित शर्मानं दिला होकार!, BCCI लवकरच जाहीर करणार गुडन्यूज

Congress | निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सर्वात मोठा धक्का?

Aishwarya Rai च्या ‘या’ चुका ठरू शकतात घटस्फोटाचं कारण!

Kamal Pardeshi | अंबिका मसाला जगभर पोहोचवणाऱ्या कमल परदेशींचं निधन!

Post Office | पोस्टाची जबरदस्त योजना; म्हातारपण जाईल आरामात

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now