Rohit Sharma ला भारतीय संघातून काढून टाकणार होते, मात्र… मोठी बातमी आली समोर

On: January 19, 2024 12:52 PM
Rohit Sharma
---Advertisement---

Rohit Sharma l दोन दिवसांपूर्वी झालेला भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना फारच रोमांचक झाला आहे. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. आता हा सामना पार पडल्यानंतर क्रिकेटप्रेमींना T20 विश्वचषक 2024 या स्पर्धेचे वेध लागले आहे. अशातच T20 विश्वचषक स्पर्धेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. (Rohit Sharma)

5 जूनपासून T20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील सुरवात :

भारतीय क्रिकेट संघ 5 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये T20 विश्वचषक 2024 चा पहिला सामना खेळणार आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या सामन्यासह टीम इंडिया 17 वर्षांनंतर पुन्हा T20 चॅम्पियन बनण्याच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी बराच कालावधी असल्याचे दिसत आहे. परंतु हा कालावधी संघ निवडीच्या दृष्टीने फारच कमी असल्याचे दिसत आहे.

या T20 विश्वचषक स्पर्धेत कोणकोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. विशेषत: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यासंदर्भात विविध चर्चा रंगत आहेत. 17 जानेवारीला बेंगळुरूमध्ये झालेल्या सीननंतर रोहितच्या जागेबाबत काही शंका असल्यास त्या दूर करणे महत्वाचे आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2022 टी-20 विश्वचषक खेळला होता, जिथे टीम इंडियाला अॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासून रोहित शर्मा या फॉरमॅटमध्ये भारतीय संघापासून दूर होता. याशिवाय टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू विराट कोहली देखील त्या सामन्यापासून दूर होता.

रोहितने सिद्ध करून दाखवले (Rohit Sharma) :

Rohit Sharma l अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यांमध्ये तो 0-0 असा बाद झाला. अशा परिस्थितीत त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु बेंगळुरूमध्ये रोहितने सर्वांना उत्तर दिले आहे. रोहितने कठीण परिस्थितीत अडकलेल्या टीम इंडियाला (Rohit Sharma) केवळ सांभाळले नाही तर विश्वविक्रमी 5 वे शतक देखील झळकावले आहे. रोहितने 69 चेंडूत 121 धावा केल्या आणि नाबाद राहिला. म्हणजेच या फॉरमॅटमध्ये संघासाठी तो अजूनही महत्त्वाचा असल्याचे रोहितने दाखवून दिले आहे.

News Title l Rohit Sharma T20 World Cup 2024

महत्त्वाच्या बातम्या –

Indian Women Hockey Match l MS Dhoni मॅच पहायला पोहोचला आणि भारतीय संघ हारला!

MHADA Lottery 2024 l Mhada कडून आनंदाची बातमी, 5311 घरांसाठी लवकरच काढणार लॅाटरी

Pakistan Targeted Militant Targets In Iran l या देशाने केला पाकिस्तानवर हल्ला

Solapur Labor Colony Opening l आज हजारो कामगारांना मिळणार हक्काचं घर! देशातील सर्वात मोठ्या कामगार वसाहतीचे उदघाटन

Ram Mandir साठी महिन्याला 2 कोटी रुपयांची देणगी; ट्रस्टने मागवल्या ‘या’ गोष्टी

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now