Rohit Sharma | गेल्या काही दिवसांपासून आयपीएल 2024 ची चर्चा सुरू आहे. यंदाची आयपीएल सुरू होण्याआधीच अनेक प्रकरणांनी वळण घेतलं आहे. मुंबई इंडियन्स संघामध्ये गुजरात टायटन्स संघाचा खेळाडू हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा विंडो ट्रेडच्या माध्यमातून मुंबई इंडियन्स संघामध्ये प्रवेश दिला. त्यानंतर हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदासाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांनी विरोध केला होता. यामुळे यंदाची आयपीएल सुरू होण्याआधी चर्चेत आली आहे.
याप्रकरणाने क्रिकेटविश्वामध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. काहींनी मुंबई इंडियन्स संघाच्या इन्स्टाग्राम हँडेलला अनफॉलो केलं आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या इन्स्टा हँडेलवर फेक फॉलोवर्स वाढवण्यात आले होते. मात्र रोहित शर्माच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं असून यावर आता टीम इंडियाचे दिग्गज माजी क्रिकेटर सुनिल गावस्कर यांनी याप्रकरणावर मौन सोडलं आहे.
काय म्हणाले सुनिल गावस्कर?
हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघासाठी कर्णधार म्हणून निवडण्यात आलं आहे. याप्रकरणावर सुनिल गावस्कर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मुंबई इंडियन्स संघाने घेतलेला निर्णय हा भविष्याच्यादृष्टीने निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आता 36 वर्षांचा झाला आहे. त्याच्यावर सध्या तिनही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी आहे. म्हणून तो दडपणात येऊ शकतो. म्हणून आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला कर्णधारपदाची धुरा संभाळायला दिली आहे, असं ते स्टार स्पोर्टच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
हार्दिक पांड्याकडे नेतृत्व देण्यामागे मुंबई इंडियन्स संघाचा फयदा आहे. कारण रोहित शर्माला फलंदाजी करता येऊ शकते. त्यानंतर संघामध्ये हार्दिक पांड्या 5 व्या क्रमांकावर खेळायला येतो, यामुळे संघाच्या 200 हून अधिक धावा करता येणार आहे, असं ते म्हणालेत.
रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघामध्ये 2015 मध्ये प्रवेश केला होता. 123 सामन्यांमध्ये 2309 धावा केल्या आणि 53 विकोट्स घेतल्या आहेत. आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वामध्ये रोहित शर्माने 5 आयपीएलच्या ट्रॉफींवर आपलं नाव कोरलं आहे.
रोहित शर्माचं मौन
रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेहने मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक बाउचर यांच्या प्रतिक्रियेला विरोध करत हे सर्व काही चूकीचं आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र अद्यापही रोहित शर्मा याप्रकरणावर मौन बाळगून आहे.
News Title – Rohit sharma mumbai indians captaincy news Update
महत्त्वाच्या बातम्या
शरद पवारांना धक्का, ‘हा’ नेता भाजपच्या वाटेवर?
‘असं वैऱ्यासोबतही घडू नये’, भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे रडला, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली
“आदर्श म्हणून माझ्याकडे पाहा मी…”, अभिजीत बिचुकलेचा तरूणांना सल्ला
ऐश्वर्याच्या सौंदर्याची कंगनालाही पडली भुरळ; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत केली प्रशंसा






