भर मैदानात रोहित शर्माला किस करण्याचा प्रयत्न, तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

On: April 23, 2024 10:34 AM
Rohit sharma
---Advertisement---

Rohit Sharma Kiss Video | मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स संघात 22 एप्रिल रोजी हायहोल्टेज सामना होणार हे निश्चित आहे. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. मात्र यंदाच्या आय़पीएलचा विचार केला कर 17 व्या हंगामात राजस्थान रॉयल्स हा संघ अव्वल स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स संघ हा सातव्या स्थानावर आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर काही दिवसांआधी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स संघ दाखल झालेत. सामन्याआधी दोन्ही संघ सराव करताना दिसले. सरावादरम्यान मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मासोबत (Rohit Sharma Kiss Video) जे काही घडलं ते पाहून हसू आवरणार नाही.

मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma Kiss Video) आणि राजस्थानचा फिरकीपटू अनुभवी गोलंदाज आर. आश्विन यांच्यात बराच वेळ बातचीत चालू होती. त्यावेळी राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक शेन बॉण्ड त्या ठिकाणी आले. त्यांनी रोहित शर्माचा (Rohit Sharma Kiss Video) किस घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रोहित बुचकळ्यात पडला. त्यानंतर रोहितने प्रशिक्षकांना गळाभेट दिली.

रोहितला किस घेण्याचा प्रशिक्षक शेन बॉण्डचा  प्रयत्न

जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचे खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचे खेळाडू काही दिवसांआधी पोहोचले होते. सरावावेळी राजस्थानचे खेळाडू आणि रोहित शर्मा चर्चा करत होते. त्यावेळी त्याठिकाणी राजस्थान रॉयल्सचे गोलंदाजीचे प्रशिक्षक आणि न्यूझीलंडचे माझी खेळाडू शेन बॉण्ड त्या ठिकाणी आले आणि त्यांनी रोहित शर्माला किस घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांनी एकमेकांना गळाभेट दिली. त्यावेळी या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर रोहित आणि शेन बॉण्डचं बॉण्डिंग व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केलं आहे आणि “त्याला काही नाती अमुल्य असतात”, असं कॅप्शन दिलंय.

मुंबई इंडियन्स हा संघ आतापर्यंत 3 सामने जिंकला आहे. तर राजस्थान रॉयल्स संघ हा 7 पैकी 6 सामने जिंकला आहे. तर राजस्थान राॉयल्स हा संघ अव्वल स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स सातव्या स्थानावर आहे. आज कोण बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष राहिलं. (Rohit Sharma Kiss Video)

संभाव्य संघ

मुंबई इंडियन्स (MI) संभाव्य प्लेइंग 11 : इशान किशन (wk), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (c), तिलक वर्मा, टिम डेविड, मोहम्मद नबी, रोमारियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्जी, आकाश मधवा

राजस्थान रॉयल्स (RR) संभाव्य प्लेयिंग 11 : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (c & wk), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.

News Title – Rohit Sharma Kiss Video IPL 2024

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार यांची ही शेवटची निवडणूक, त्यांचा पक्ष सुद्धा अस्तित्वात राहणार नाही!

ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाचा झटका!

चिन्मय मांडलेकरच्या निर्णयाने दिग्पाल लांजेकरांचं नुकसान?, नव्या चित्रपटाबद्दल थेट बोलले…

‘पूर्ण बरे होऊनच परत या…’; ‘या’ नेत्याने भरला संजय राऊतांचा मनोरूग्णालयाचा फॉर्म

‘देशात मोदींच्या रुपाने नवीन पुतीन तयार होतोय…’; शरद पवारांची मोदींवर टीका

Join WhatsApp Group

Join Now