Rohit Sharma ला खुनावतोय ‘विराट’ विक्रम; धोनीलाही मागं टाकण्याची सुवर्णसंधी

On: January 10, 2024 8:42 AM
Rohit Sharma
---Advertisement---

Rohit Sharma । भारताच्या ट्वेंटी-20 संघात हिटमॅन रोहित शर्माचं मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन झालं आहे. मागील ट्वेंटी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली एकाही ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दिसले नव्हते. मात्र, आता अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेसाठी या दिग्गजांची संघात एन्ट्री झाली आहे. 11 जानेवारीपासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेला सुरूवात होत आहे. कर्णधार रोहित शर्माचे तब्बल 14 महिन्यांनंतर ट्वेंटी-20 संघात पुनरागमन झाले आहे. रोहित अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत 4 मोठे विक्रम करू शकतो. यावेळी तो माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांना मागे टाकतो का हे पाहण्याजोगे असेल. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नुकताच दक्षिण आफ्रिकेत 2 सामन्यांची कसोटी मालिका अनिर्णित ठेवून परतला आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानचा संघ नुकताच यूएईचा पराभव करून भारताला ट्वेंटी-20 मालिकेत आव्हान देण्यासाठी भारतात आला आहे.

Rohit Sharma ला यशस्वी कर्णधार बनण्याची संधी

रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या घरच्या ट्वेंटी-20 मालिकेतून या फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनू शकतो. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 51 पैकी 39 ट्वेंटी-20 सामने जिंकले आहेत. या बाबतीत महेंद्रसिंग धोनी 72 सामन्यांपैकी 41 विजयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. जर भारतीय संघ अफगाणिस्तानला या मालिकेत क्लीन स्वीप करण्यात यशस्वी ठरला, तर रोहित माहीला मागे टाकून ट्वेंटी-20 मध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनू शकतो.

टेंटी-20 मध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल आहे. विराटच्या नावावर 50 सामन्यांमध्ये 1570 धावांची नोंद. 36 वर्षीय रोहित शर्माने कर्णधार म्हणून आतापर्यंत 51 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये 1527 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध 44 धावा करताच तो विराटला याबाबतील मागे टाकेल. रोहित अफगाणिस्तानविरुद्ध इंदूरमध्ये 150 वा ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरणार आहे. रोहितने आतापर्यंत 148 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, तिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मुकेश यादव, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.

अफगाणिस्तानचा संघ –

इब्राहिम झाद्रान (कर्णधार), रहमतुल्लाह गुरबाज, हशमतुल्लाह झाझाई, इब्राहिम अलिखिल, रहमत शाह, मोहम्मद नबी, एन. झाद्रान, के. जनात, ए. ओमरजाई, एस. अश्रफ, एम. रहमान, एफ. फारुखी, एफ. मलिक, नवीन उल हक, एन. अहमद, एम. सालेम, क्यू अहमद, राशिद खान आणि गुलबदीन नईब.

भारत-अफगाणिस्तान मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना, 11 जानेवारी – मोहाली
दुसरा सामना, 14 जानेवारी – इंदूर
तिसरा सामना, 17 जानेवारी – बंगळुरू

Online Electricity Bill l ग्राहकांनो…अशाप्रकारे घरबसल्या लाईटबिल भरा तेही अगदी काही मिनिटांत

Play Store App Download Alert l सावधान! Play Store वरून कोणतेही ॲप डाउनलोड करताय…? मग त्याआधी या गोष्टी ठेवा लक्षात

Goa हत्याकांड! महिला CEO कडून पोटच्या मुलाची हत्या; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Lakshadweep Island Tourism l निसर्गाचा मनमोहक आनंद घेयचा असेल तर लक्षद्वीप बेटाला भेट द्या!

Mohammed shami | “PM मोदी आपल्या देशाला…”, मालदीव वादावर शमीचं मोठं विधान

 

Join WhatsApp Group

Join Now