Rohit Sharma | रोहित शर्मा फिट नाही?, बीसीसीआयचा सर्वात मोठा खुलासा

On: December 11, 2023 5:28 PM
Rohit Sharma
---Advertisement---

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या फिटनेसबद्दल कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक अंकित कालियार यांनी अलीकडेच यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ऱोहित शर्माच्या फिटनेसबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलंय ते अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.

अंकित कालियार नेमकं काय म्हणाले?

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माबद्दल फार बोललं जातंय. तो फिट नाही का?, असा सवाल उपस्थित केला जातोय. अंकित कालियार यांनी यावरच भाष्य केलंय.  “टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहलीइतकाच तंदुरुस्त आहे”, असं त्यांनी म्हटलंय. त्याच्या या वक्तव्यानंतर नव्या चर्चांना सुरुवात झालीय. कालियार यांनी म्हटले आहे की, रोहितची तब्येत जास्त आहे, याचा अर्थ असा नाही की तो पुरेसा फिट नाही. त्यांनी असंही नमूद केले, की “भारताचा कर्णधार यो-यो चाचणी देखील यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला आहे”

“रोहित शर्मा (Rohit Sharma) एक फिट खेळाडू आहे. त्याचा फिटनेस चांगला आहे. तो थोडा अवजड दिसतो पण तो नेहमी यो-यो चाचणी पास करतो. तो विराट कोहलीसारखाच फिट आहे. तो जाड आहे असे दिसते पण आम्ही त्याला मैदानावर पाहिले आहे. त्याची चपळता आणि गतिशीलता अप्रतिम आहे. तो सर्वात योग्य क्रिकेटपटूंपैकी एक आहे.” अंकित कालियार यांनी म्हटलं आहे.

शुबमन गिल बाबत काय म्हणाले?

“शुबमन गिल एक खूप फिट खेळाडू आहे. नुसता तंदुरुस्त नाही तर तो एक अतिशय कुशल खेळाडू आहे. शुभमन विराट भाईपासून तो प्रेरित आहे, यात शंका नाही. फलंदाजी असो, तंदुरुस्ती असो किंवा इतर कौशल्यं असो, शुभमन विराट भाईला फॉलो करत आहे. मला खात्री आहे की शुभमन येत्या काही वर्षांत देशासाठी चांगली कामगिरी करेल, असंही ते म्हणाले.

विराट कोहलीबाबतही केलं महत्त्वाचं वक्तव्य-

“विराट कोहली हा भारतीय संघ आणि जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. त्यामागील कारण म्हणजे तो काटेकोर वेळापत्रक पाळतो. तो खेळत असो वा नसो, तो त्याचं प्रशिक्षण, पूरक आहार या गोष्टींचे पालन करतो.तो त्याच्या कारभाराबद्दल आणि दिनचर्याबद्दल खूप काटेकोर आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, विराट कोहलीने 2023 आशिया कपच्या आधी एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये त्याचा यो-यो टेस्ट स्कोअर उघड केला होता. त्याने 17.2 स्कोअर मिळवला होता, त्यावरुन त्याच्यावर टीका झाली होती तर काही जणांनी त्याचं कौतुक केलं होतं.

News Title: Rohit Sharma fitness information

महत्त्वाच्या बातम्या-

Madhya Pradesh CM | मध्य प्रदेशात भाजपचा मोठा धक्का, ‘या’ नेत्याला केलं मुख्यमंत्री

Maharashtra News | सर्वात मोठी बातमी! मराठवाड्यातील ‘या’ भागात नागरिकांना धोका

HDFC बँकेची मोठी घोषणा; ‘या’ लोकांना फायदाच फायदा

Weather Update | हुडहुडी वाढणार!, महाराष्ट्राच्या ‘या’ भागाला हवामान खात्याचा इशारा

Shani | शनिच्या साडेसातीपासून राहा सावध, नव्या वर्षात ‘या’ राशींना मोठा धोका

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now