Rohit Pawar | सर्वात मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीचा झटका

On: January 19, 2024 4:59 PM
Rohit Pawar
---Advertisement---

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गटाच्या आमदारांवर एक एक संकटे येत आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स धाडलंय. त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलंय.

ईडीने 15 दिवसांपूर्वीच रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अ‍ॅग्रोशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर आता रोहित पवार यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं आहे. या छापेमारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

Rohit Pawar यांना ईडीचे समन्स

रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवर यापूर्वी (Baramati Agro) ईडीने छापा टाकला होता. मुंबई आणि मुंबईच्या जवळच्या काही ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड हा एक उद्योग समूह आहे. रोहित पवार बारामती अ‍ॅग्रोचे सीईओ आहेत. तर त्यांचे वडील राजेंद्र पवार संचालक आहेत. पशू खाद्य हे बारामती अ‍ॅग्रोचं मुख्य प्रोडक्ट आहे.

Rohit Pawar | नेमकं प्रकरण काय?

औरंगाबादमधील कन्नड सहकारी साखर कारखान्यानं राज्य सहकारी मध्यवर्ती बँकेकडून 2012 साली 50 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कालांतरानं या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. हा कारखाना बारामती अ‍ॅग्रो प्रा. लि. कंपनीनं खरेदी केला.

बारामती अॅग्रोबरोबरच हायटेक इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. व अन्य एका कंपनीनं लिलाव प्रक्रियेत भाग घेतला होता. बँक खात्याच्या छाननीत असं आढळून आलं की बारामती अ‍ॅग्रो कंपनीनं 25 ऑगस्ट 2022 रोजी हायटेक इंजिनीअरिंगला 5 कोटी रुपये दिले होते. त्यानंतर दोन दिवसांनी हायटेक इंजिनीअरिंगनं लिलावात भाग घेतला.

बारामती अ‍ॅग्रोनं कन्नड सहकारी साखर कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेले पैसे प्रत्यक्षात खेळत्या भांडवलाची गरज भागवण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या बँकांकडून घेतले होते. मात्र ते त्यासाठी न वापरता कारखाना खरेदी करण्यासाठी वापरले. बँकेकडून मिळालेल्या पैेसे वळवण्याचा हा प्रकार दिसतो, असं ईडीनं न्यायालयात सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Student Niamh Hearn | रोज पार्ट्या करुन करुन तरुणी होत चालली होती जाड, एके दिवशी अचानक…

Google Chrome ने बदलली पॅालिसी, आता अशाप्रकारे सर्च केलं तर खासगी राहणार नाही!

Jallikattu Bull | शर्यतीच्या बैलाला जबरदस्ती खाऊ घातला कोंबडा, 3 जणांवर मोठी कारवाई

गुंतवणूकदारांना Share Market तज्ज्ञांचा सल्ला; ‘हा’ स्टॉक बनेल रॉकेट

Ram Mandir l 22 जानेवारीला कुठल्या राज्यांनी दिली सुट्टी, महाराष्ट्रात पण सुट्टी देणार?, मोठी बातमी

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now