“आमच्या काकांनी मला अडचणीत आणण्यासाठी…”; रोहित पवारांचा गंभीर आरोप

On: February 28, 2024 4:27 PM
Rohit Pawar serious allegations against Ajit Pawar
---Advertisement---

Rohit Pawar | राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांचीच यावेळी अधिक चर्चा होत आहे. कालचा दिवस मनोज जरांगे यांच्या नावाने गाजला. सभेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केलं जात आहे. यावरच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारानेही (Rohit Pawar) संधी साधत टीका केली.

रोहित पवारांचा अत्यंत गंभीर आरोप

बीडमध्ये घडलेली घटना सत्तेतील लोकांनीच घडून आणली. त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी करायला पाहिजे. गेल्या काही दिवसांत काही गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतात. देवेंद्र फडणवीसांना गुंड भेटतात, अजित पवारांना गुंड भेटतात. मग लोकसभेला तुम्ही गुंडाचा वापर करणार आहे का?, असा थेट सवालच यावेळी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.

यासोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधत अत्यंत गंभीर आरोप केला. “मला वाईतंय की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे पूर्वीपासूनच गुंडांना भेटत असावेत. आमच्या काकांनीसुद्धा मला अडचणीत आणण्यासाठी माझ्या मतदारसंघातील गुंडाला जवळ केलंय. ही तुमची वृत्ती आहे. भाजपच्या जवळ गेल्यानंतर दादांना माझा असा प्रश्न आहे की तुम्ही गुंडांचा वापर करणार?”, असा गंभीर सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीसांवर एसआयटी लावावी

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललं गेलं तर एसआयटी लावली गेली. मग, स्पर्धा परीक्षा, भरती यावर पेपरफुटी होत आहे त्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे असं मी म्हणतो, आता एसआयटी लावा. मी युवांच्या बाजूने फडणवीसांच्या विरोधात बोलतोय. त्यामुळे माझ्यावर एसआयटी लावावी, असंही ते म्हणालेत.

या सर्वमागे फडणवीस, अजित दादा आणि मुख्यमंत्र्यांचा हात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात त्यावर एसआयटी लावणार का? उद्योगधंदे महाराष्ट्रातून बाहेर गेले त्यावर एसआयटी लावणार का? नेत्यांबद्दल बोलले तर एसआयटी लागते गरिबांच्या हक्कासाठी बोललो तर एसआयटी लागत नाही का?, असा खोचक सवाल यावेळी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलाय.

आज पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी मोठे खुलासे केले. अजित पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत त्यांनी राजकारणात एका वेगळ्याच चर्चेला हवा दिली आहे. आता यावर अजित दादा काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

News Title- Rohit Pawar serious allegations against Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या –

अत्यंत धक्कादायक! शालेय पोषण आहारात चक्क मेलेल्या उंदराचे अवशेष

मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स लावत काँग्रेसचा प्रचार!

संकष्टी चतुर्थीचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरेल अत्यंत शुभ!

शरद पवारांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज; थेट म्हणाले..

‘अरे ही तर पॉर्न किंगची बायको..’, प्रसिद्ध अभिनेत्री झाली ट्रोल

Join WhatsApp Group

Join Now