Rohit Pawar | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या कुटुंबावरून व्यक्तिगत टीका केलीये. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय बंड झालं. मात्र शरद पवार आणि अजित पवार यांच्या कुटुंबात देखील फूट पडली आहे. यावरून नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना कुटुंब सांभाळता येत नाही. महाराष्ट्र काय सांभाळणार?, असा सवाल केला आहे.
नरेंद्र मोदींच्या टीकेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का?. लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी तुमची गत आहे,” असं म्हणत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं.
शरद पवार यांनी कितीही राजकीय रंग लावू द्या. मात्र हा कौटुंबिक वाद आहे. पुतण्याला वारसा सोपवायचा की मुलीकडे द्यायचा हा त्यांचा वाद आहे. सिंपथीऐवजी संतापाचं वातावरण आहे. ते या वयात कुटुंब सांभाळू शकत नाहीत. महाराष्ट्र काय सांभाळतील?, असा खोचक सवाल नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावर आता रोहित पवार यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर दिलंय.
“कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का?
“आदरणीय मोदी साहेब, कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का? “लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण” अशी तुमची गत आहे. पत्रकारांना कधीही सामोरे न जाणाऱ्या आपल्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्रासाठी एक स्पेशल मुलाखत करावी लागतेय, यावरूनच मराठी स्वाभिमानाचा आणि पवार साहेबांचा आपण किती धसका घेतला, हे आज कळलं. असो! पण मराठी माणूस दिल्लीला कशाप्रकारे झुकवू शकतो याचा एक स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान आहे”, असं म्हणत रोहित पवार यांनी मोदींंना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
आदरणीय मोदी साहेब,#कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का?
“लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण” अशी तुमची गत आहे….पत्रकारांना कधीही सामोरे न जाणाऱ्या आपल्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्रासाठी एक स्पेशल मुलाखत करावी लागतेय, यावरूनच मराठी… pic.twitter.com/u9waWrlX8g
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 2, 2024
भटकी आत्मा
राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. राजकारणाच्या डिक्शनरीमध्ये मोदींनी एका शब्दाची भर टाकली. शरद पवार यांच्यावर त्यांनी भटकी आत्मा आणि भुताटकी अशी टीका केली होती. गेल्या काही वर्षांपासून भटकी आत्मा महाराष्ट्रात फिरत आहे, अशी टीका केली होती. त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याच शब्दावरून मोदींना सुनावलं आहे.
News Title – Rohit Pawar Replied To Pm Modi About His Statement To Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या
महत्वाची बातमी! आरोग्य विमा घेणाऱ्यांना आणखी एक मोठा धक्का
सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ, निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
सुषमा अंधारेंचं हेलिकॅाप्टर कोसळलं, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर
कोपर्डी बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट; …त्याला स्मशानभूमीत रात्रभर नग्न बसवले
मोठी दुर्घटना! हेलिकॉप्टर झालं क्रॅश; सुषमा अंधारे अन् पायलट…






