मोठी दुर्घटना! हेलिकॉप्टर झालं क्रॅश; सुषमा अंधारे अन् पायलट…

On: May 3, 2024 10:27 AM
Sushma Andhare
---Advertisement---

Sushma Andhare l सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय नेत्यांची प्रचारसभेसाठी धावपळ सुरु आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना आणण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Sushma Andhare l या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही

सुषमा अंधारे यांना आणण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर महाड मध्ये क्रश झालं आल्याचं वृत्त समोर येत आहे. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटना प्रकरणी सुषमा अंधारे आणि हेलिकॉप्टरचा पायलेट दोघेही सुरक्षित आहेत. कारण अपघात झाला त्यावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या. त्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच त्यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे.

मात्र महाडमध्ये झालेली ही घटना अत्यंत खळबळजनक आहे. महाडमध्ये क्रॅश झालेलं हेलिकॉप्टर नेमकं कशामुळे क्रॅश झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सुषमा अंधारे या इतर वेळी त्यांच्या आक्रमक शैलीमुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी या घटनेमुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

News Title – Sushma Andhare Helicopter Crashed

महत्त्वाच्या बातम्या –

काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात; या दोन गोष्टींमुळे गांधींचं पारडं जड राहणार

धक्कादायक… ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांवर हल्ला

या राशीच्या व्यक्तींनी सावधान; मित्रांशी मतभेदाची शक्यता

विखेंच्या कार्यकर्त्यांनी खोटा संदेश सोशल मीडियात व्हायरल केला, अण्णांच्या भूमिकेमुळे विखे संकटात!

‘तुमच्यामुळे माझी आई गेली’; गावकऱ्याने सुजय विखेंना विचारला जाब

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now