भाजपनं अजित पवारांना लोकल नेता बनवलं, त्यांनी बारामतीत… रोहित पवारांनी सांगितली भाजपची चाल

On: April 20, 2024 6:33 PM
Rohit Pawar On Ajit Pawar
---Advertisement---

Rohit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघ यावेळी अधिक चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे दोन गट पडल्याने येथे पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. बारामतीत शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा संघर्ष होणार आहे. दोन्ही गटाकडून येथे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जातंय. त्यातच गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार आणि अजित पवार यांच्यातील वादही आता चव्हाट्यावर येताना दिसत आहेत.

दोघेही एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. रोहित पवार अजित दादा भाजपवर सतत टीका करताना दिसतात. कधी जागा वाटप तर कधी युतीवरून ते टोले लगावत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा अजित दादांवर निशाणा साधला आहे.

भाजपनं अजित पवारांना लोकल नेता केलं, त्यांनी बारामतीत अडकून राहावं ही भाजपची चाल असल्याची बोचरी टीका रोहित पवारांनी अजित पवारांवर केली आहे. आज माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

काय म्हणाले रोहित पवार?

‘शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करत असताना दादा महाराष्ट्रभर फिरायचे पण मात्र सध्या ते बारामतीमध्ये अडकलेले आहे. भाजपने त्यांना लोकल नेता बनवलं आहे. शरद पवारांच्या वयाबाबत कायम बोललं जातं . पण, आज आमचा 70 वर्षाचा युवा नेता राज्यभर 40 ते 50 सभा घेणार आहेत. मात्र अजित पवार फक्त बारामतीत फिरताना दिसत आहे.’, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

इतकंच नाही तर पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रात अजित पवारांनी बोलू नये, अशी भाजपची इच्छा आहे. अजित पवारांसंदर्भात राज्यात नकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच त्यांचा उमेदवार तीन लाखांनी मागे दिसत असल्याचं चित्र असल्याचंही रोहित पवारांनी (Rohit Pawar) म्हटलंय.

त्यामुळे पुन्हा एकदा राजकारणात काका पुतण्यांमधील वाद समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यापासून दोघेही सतत काही न काही कारणांवरून एकमेकांवर टीका करताना दिसून येतात. आता तर बारामतीवरून त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे.

News Title : Rohit Pawar On Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या – 

उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पीत असाल तर सावधान, तज्ज्ञांचा मोठा इशारा

भाजपकडून भीती दाखवली जातेय!, अजित पवार गटाच्या नेत्याचे धक्कादायक आरोप

जुन्या जखमा अजून भरलेल्या नाहीत!, पाटलांच्या पोरीच्या वक्तव्याने अजित पवारांच्या पोटात गोळा

बारामतीसाठी अजित पवारांचं सपशेल लोटांगण, फडणवीस सांगतील ती पूर्व दिशा!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मोदी पुण्यात येणार, तारीख आली समोर

Join WhatsApp Group

Join Now