Rivaba Jadeja | जड्डूच्या घरात राजकीय कलह; राम मंदिरावरून वहिणी-नणंद भिडल्या!

On: January 19, 2024 7:50 AM
Rivaba Jadeja
---Advertisement---

Rivaba Jadeja | 22 जानेवारीला संपूर्ण देश राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्याच्या तयारीत आहे. रामललाच्या अभिषेकाच्या पार्श्वभूमीवर देशातच नाही तर परदेशातही प्रचंड उत्साह आहे. या ऐतिहासिक दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. या मुद्द्यावरून बरेच राजकारण देखील सुरू आहे. भाजप राम मंदिराच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी केला आहे.

जड्डूच्या घरात राजकीय कलह

काँग्रेसने 22 जानेवारीला होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार दिल्याने देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्याचा परिणाम गुजरातमध्येही दिसून आला आहे. भाजप आमदार आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा म्हणते की, राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. त्यांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे.

मात्र, रिवाबाच्या विधानाला तिच्या घरातून प्रत्युत्तर मिळाले आहे. रिवाबा जडेजाची नणंद आणि काँग्रेस नेत्या नयनाबा म्हणाल्या की, रिवाबा यांना धर्माचे काहीच ज्ञान नाही. अशा परिस्थितीत मूल्ये आणि धर्माबद्दल बोलणे त्यांना शोभत नाही. प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण भाजपच्या लोकांनाच पाठवले जात असल्याचेही त्या म्हणाल्या.

Rivaba Jadeja ची सावध प्रतिक्रिया

गुजरातमध्ये नणंद आणि वहिणी यांच्यातील शाब्दिक युद्ध पुन्हा एकदा समोर आले आहे. जामनगरमधील भाजप आमदार रिवाबा जडेजा आणि त्यांची नणंद नयनाबा यांच्यात राम मंदिराच्या मुद्द्यावरून शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. काँग्रेसने निमंत्रण नाकारल्यावर रिवाबा जडेजा म्हणाली की, हा कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचा विषय आहे, ज्याची ते वर्षानुवर्षे वाट पाहत आहेत. राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. त्यांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. भगवान श्री रामाचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव होणार आहे, त्यामुळे सर्वांनी प्रभू रामाचे स्वागत आनंदाने करावे.

वहिणी-नणंद भिडल्या!

वहिणी रिवाबा जडेजाचे म्हणणे नयनाबा यांना खटकले. त्यांनी काँग्रेसची भूमिका मांडत सांगितले की, जे कोणी असे म्हणत आहे त्यांना धर्माचे काहीच ज्ञान नाही. अशा परिस्थितीत मूल्ये आणि धर्माबद्दल बोलणे शोभत नाही. आम्हाला कोणाकडून भक्ती आणि संस्कार शिकण्याची गरज नाही. जेव्हा राम मंदिर पूर्णपणे तयार होईल, तेव्हा काँग्रेसमधील सर्वजण देवाचे दर्शन घेण्यासाठी जातील, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या रामललाच्या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्यास काँग्रेसने नकार दिला आहे. काँग्रेसने कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले आहे. यावरून काँग्रेसवर जोरदार टीका होत आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे भाजपच नव्हे तर काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्तेही नाराज असल्याचे कळते.

News Title- Rivaba Jadeja criticizes Congress over Ram mandir
महत्त्वाच्या बातम्या  –

Ram Mandir | …म्हणूनच कारसेवकांवर गोळ्या झाडल्या; मुलायम यांच्या लहान भावानं सांगितलं कारण

“आता तुझ्यासोबत म्हातारा व्हायचंय…”, Arbaaz Khan ची पत्नी शूरासाठी खास पोस्ट

जगातील सर्वात श्रीमंत देशात Beer मिळणार नाही! विक्री थांबणार, जाणून घ्या कारण

Government | मुलाला कोंचिगला टाकताय? 16 वर्ष पूर्ण आहेत ना? वाचा सरकारची नवी नियमावली

Sachin Tendulkar चा 50 व्या वर्षीही जलवा ‘कायम’, इरफान पठाणचा ‘विजयी’ षटकार

 

Join WhatsApp Group

Join Now