रितेश-जेनेलियाच्या वेडनं केली तब्बल ‘इतक्या’ रूपयांची कमाई

On: January 19, 2023 5:03 PM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूडमधील(Bollywood) सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या कपलपैकी रितेश-जेनेलियाची(Riteish- Genelia) एक जोडी आहे. त्या दोघांची केमिस्ट्री पाहायला प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. त्यातच 2022 वर्षा अखेरीस रिलीज झालेल्या रितेश-जेनेलियाच्या ‘वेड'(Ved Movie) या चित्रपटानं प्रेक्षकांना खरच वेड लावलं आहे.

वेड हा चित्रपट प्रदर्शित होऊन 18 दिवसांचा काळ उलटला तरी हा चित्रपट पाहण्यास सिनेमागृहात अजूनही प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. आता सगळीकडं या चित्रपटाच्या कमाईची जोरदार चर्चा होत आहे.

सध्या मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटानं सोमवारी एका दिवसात 1.04 कोटी रूपयांची कमाई केली आहे. वेडनं अठरा दिवसांत तब्बल 48.70 कोटींची कमाई केली आहे.

एकूणच वेड चित्रपट बाक्स ऑफीसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरत आहे असं दिसतंय. आता काही तासातच हा चित्रपट 50 कोटींचा गल्ला कमवण्यास यशस्वी ठरेल, असा अंदाज आहे.

दरम्यान, रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट होता तर जेनेलियाचा हा पहिला मराठी चित्रपट होता. परंतु मराठी सिनेसृष्टीतही आपली कमाल त्यांनी दाखवून दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now